गोंदिया: अल्पसंख्यक मंत्री व पालकमंत्री गोंदिया श्री नवाब मलिक 26 व 27 सेप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौरे वर

381 Views
प्रतिनिधि।
गोंदिया,दि.24 : पालकमंत्री नवाब मलिक हे 26 व 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूर येथून मोटारीने भंडारा, सडक अर्जुनी मार्गे गोंदियाकडे प्रयाण. रात्री 9 वाजता गोंदिया येथे आगमन व राखीव-मुक्काम.
27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक. सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधिक्षक यांच्या समवेत बैठक. सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या
समवेत बैठक.
सकाळी 10.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या समवेत बैठक. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात चालू हंगाम व नविन हंगामासाठी धान खरेदी केंद्र संस्थांची निवड करणेबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक.
सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय कारंजा (गोंदिया) येथील प्रेरणा सभागृहात जनता दरबार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात Whats app-based COWIN Voice Bot ॲपचे उद्घाटन करतील. दुपारी 1 ते 1.45 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 1.45 वाजता गोंदिया येथून मोटारीने गोरेगावकडे प्रयाण व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.45 वाजता गोरेगाव येथून लाखनी जि.भंडारा कडे प्रयाण करतील.

Related posts