गोंदिया: जाती दावा पडताळणीचे अर्ज ऑफलाईन सुद्धा जमा करावे- राजेश पांडे यांचे आवाहन

532 Views  गोंदिया, दि 15: सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी या सारख्या, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असुन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश शा. पांडे यांनी केले आहे.  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना…

Read More

….तर खऱ्या अर्थानं “रयतेचे राज्य”निर्माण होणार- जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

567 Views जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत शिवस्वराज्य दिन साजरा प्रतिनिधि। 06 जून गोंदिया- रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार आहे. सामान्य गोरगरीब जनतेची कामे त्यांच्या राजकारभारात उत्तम रित्या करण्यात आली म्हणूनच त्यांना,”रयतेचा राजा” ही बिरुदावली लावण्यात आली. जिल्हा परिषद ही सुद्धा मिनी मंत्रालय असल्याने अनेक ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनता विविध कामासाठी येत असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांची कामे वेळेतच पूर्ण करून खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. जिल्हा…

Read More

उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 454 पाणी पुरवठा योजनांना मान्यता, गोंदियाच्या 33 योजनांचा समावेश

604 Views  गोंदिया दि. 1:- प्रत्येक घरी नळाने पुरेशा प्रमाणात गुणवत्तेसह पाणी पोहचविण्याचे राज्यशासनाचे उद्दिष्ट आहे.  त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन या योजना अधिक वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आज एकूण 454 पाणी पुरवठा योजनांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 451 व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या 03 योजनांचा समावेश असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. *यात गोंदिया जिल्ह्यातील 33 योजनांचा समावेश आहे. आज मंत्रालयात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वर्धा-105 (08 सौर ऊर्जेवर आधारित जनासह), यवतमाळ-23, गोंदिया-33,…

Read More

गोंदिया: उद्या (27मे), राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रब्बी धान खरेेदी मर्यादा वाढवून मागण्यासाठी केद्र सरकारचे विरोधात धरणे आंदोलन व धडक मोर्चा

462 Views  प्रतिनिधि। 26 मे। गोंदिया। गोंदिया जिल्हयातील या वर्षीच्या उन्हाळी हंगामातील सुमारे 68 हजार हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी धानाची लागवड केली आहे. मागील वर्षी २२ लाख क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली होती. त्यानुसार या वर्षी राज्य शासनाने केद्र शासनाकडे सुमारे 30 लाख क्विंटल धान खरेदी ची परवानगी मागीतली होती. पण केंद्र शासनाने फक्त 11 लाख क्विंटलची संपूर्ण राज्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे एकरी 8 क्विंटल धान विकता येईल. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरवाती पासूनच हि मर्यादा वाढवून दयावी म्हणून मा.श्री प्रफुल पटेल यांचे मार्फत प्रयत्न सुरु केले. पण अजूनपर्यत केंद्र…

Read More

गोंदिया: पांगोली नदी खोलीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव शासनास सादर, शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी साठा उपलब्ध होणार

873 Views पांगोली उगम ते संगमापर्यंत ५९ बंधाऱ्याचे बांधकाम       गोंदिया, दि.19 : पांगोली नदीपात्रातुन साचलेला गाळ काढुन नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास नदीकाठावरील गावातील पाणी टंचाई दूर होऊन पर्यायाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी साठा उपलब्ध होईल व परिसरातील गावांना पुराचा धोका कमी होईल. याकरिता प्रातिनिधीक स्वरुपाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू असून शासनाकडून लवकरच मान्यता मिळणार आहे. पांगोली नदीच्या उगम ते संगमापर्यंत एकुण ५९ बंधा-यांचे बांधकाम झालेले आहे.          पांगोली नदीचे उगम तेढा ता. गोरेगाव येथे झालेला असुन छिपीया गावा नजीक बाघ नदीला संगम होतो. या नदीवर…

Read More