….तर खऱ्या अर्थानं “रयतेचे राज्य”निर्माण होणार- जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

291 Views

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत शिवस्वराज्य दिन साजरा

प्रतिनिधि। 06 जून

गोंदिया- रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार आहे. सामान्य गोरगरीब जनतेची कामे त्यांच्या राजकारभारात उत्तम रित्या करण्यात आली म्हणूनच त्यांना,”रयतेचा राजा” ही बिरुदावली लावण्यात आली. जिल्हा परिषद ही सुद्धा मिनी मंत्रालय असल्याने अनेक ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनता विविध कामासाठी येत असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांची कामे वेळेतच पूर्ण करून खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत आज ६ जून रोजी सकाळी ११ वाजता शिवस्वराज्य दिनानिमित्त ध्वजपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य नरेश भांडारकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संजय गणवीर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटील यांनी ही मार्गदर्शन करताना कर्मचारी यांनी वेळेचे पालन करीत कामाचा निपटारा तात्काळ करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

Related posts