गोंदिया: जाती दावा पडताळणीचे अर्ज ऑफलाईन सुद्धा जमा करावे- राजेश पांडे यांचे आवाहन

369 Views

 

गोंदिया, दि 15: सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी या सारख्या, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असुन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश शा. पांडे यांनी केले आहे.

 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते.

वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये.

तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे व ज्यांचे मानीव दिनांक पुर्वीचे जातीच्या प्रवर्गानुसार (अनु. जाती करीता 10 ऑगस्ट 1950, विजा भज करीता 21 नोव्हेंबर 1961 व इमाव तसेच विमाप्र करीता 13 ऑक्टोंबर 1967 ही मानीव दिनांक) मानीव दिनांकापुर्वीचे, लगतचे जात नोंदीचे व अधिवासाचे पुरावे आहेत, त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज करावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदियाचे उपायुक्त तथा सदस्य राजेश शा. पांडे यांनी केले आहे.

Related posts