1,254 Views विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई दि. 26 – माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड…
Read MoreCategory: सालेकसा
गोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
1,947 Views मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Read Moreकोरोना संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व इतर नुकसानीसाठी शासनाने केली मदत जाहीर…
1,393 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…
Read Moreजैन आचार्य श्री विद्यासागर महाराज के अंतिम संस्कार में जा रहे श्रद्धालुओं की कार नहर में गिरी, 3 मृत 3 घायल
3,864 Views गोंदिया जिले के आमगांव-सालेकसा मार्ग पर पानगांव में हुआ हादसा.. प्रतिनिधि। 18 फरवरी गोंदिया। जैन मुनि श्री विद्या सागरजी महाराज के रात 2.30 के बजे के दौरान निधन (सल्लेखना पूर्वक समाधि) होने तथा आज दोपहर उनका अंतिम संस्कार छत्तीसगढ़ के डोंगरगढ़ स्थित चंद्रगिरी तीर्थ पर होने से पूरे देश से उनके अनुयायी, उन्हें मानने वाले डोंगरगढ़ पहुँच रहे है। इसी दर्शन के लिए मध्यप्रदेश के रीवा-सतना से निकला एक जैन समाज गोंदिया जिले के सालेकसा तहसील अंतर्गत ग्राम पानगांव में सड़क हादसे का शिकार हो गया। जिसमें…
Read Moreराज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई
1,974 Views माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…
Read More