697 Views गोंदिया-(ता.18) मागच्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यासाठी गाव पातळीवर कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षादलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सतर्कतेने कार्य करावे असे आवाहन गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी केले. ते शनिवारी( ता.17) ग्रामीण पोलीस स्टेशन च्या आवारात पोलीस पाटलांच्या मासिक सभेत बोलत होते. मागच्या काही दिवसापासून ग्रामीण भागात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस विभागही आपल्या परीने रात्री ग्रस्त करून या घटनांना पायबंद घालीत आहे. तरीपण या घटनांवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी गावातील पोलीस पाटील…
Read MoreCategory: मराठी बातम्या
सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी
440 Views मुंबई। गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या…
Read Moreराज्यात सर्वाधिक १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री भंडाऱ्यात
441 Views नागपूर दि.13 : नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू धोरण राबविण्यात येत असून वाळुची सर्वाधिक विक्री व नोंदणी भंडारा जिल्ह्यात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात २ हजार 736 नागरिकांनी २० हजार ब्रास वाळुसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यापैकी १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री झाली आहे. नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असेलेल्या रेतीसाठी (वाळू) ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा आहे. यानुसार 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी सशुल्क सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना घरपोच वाळू मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात नोंदणी केलेल्या…
Read Moreमाजी आमदार चरण वाघमारे यांचे कुशल नेतृत्वात सिहोऱ्यात अनेकांच्या बीआरएस पक्ष प्रवेश
488 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा.राज्यासह सम्पूर्ण देशात आता तेलंगणा पॅटर्न लागू करावा या मागणीसाठी सिहोरा येथील विविध पक्षांशी जडलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी रामप्रसाद ठाकरे,धरम बिसने, सहादेव तुरकर ,रमेश बाबा राऊत, भावराव जी राऊत, फिरोज खान पठाण, विकास बिसने ,छोटू गौतम ,गोलू गौतम ,विजय गौतम, पिंटू तुरकर, अशोक गौतम, दिनेश बिसने, बाबा सोनवणे ,सेवानंद ठाकरे, प्यारेलाल पारधी ,दिलीप पारधी, भीमा बघेले, रंजीत बिसने, विनोद गौतम,छोटेलाल पारधी ,मगन शरणागत ,कृष्णा लसूणते, नरेश चौधरी, राजेश पराते, रवींद्र राहागडाले ,मोहित पढारे, अतुल बिसने, अशोक सोनवणे, टेकचंद तूरकर ,अनिस बीसने ,अथर्व…
Read Moreकेंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला केले 7472 कोटी रूपयांचा कर वाटप….
573 Views नवी दिल्ली, 12: केंद्र शासनाने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या सामान्य मासिक हस्तांतरणा एवजी कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज जारी केले असून, महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 7472 कोटी रूपयांचा कर वाटप करण्यात आले आहे. वित्त विभागाने 12 जून 2023 रोजी निगर्मित केलेल्या वृत्त विशेषामध्ये, राज्यनिहाय कर वाटप यादी प्रसिध्द केली आहे. केंद्र शासनाने राज्य सरकारांना एकूण ₹1,18,280 कोटी रुपयांचा कर वाटपाचा तिसरा हप्ता जारी केला आहे. सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या रुपये 59,140 कोटींचा नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला जात आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला…
Read More