गोंदिया: पोलीस पाटलांनी सतर्क राहून कार्य करावे, PI सचिन म्हेत्रे यांचे आवाहन

482 Views

 

गोंदिया-(ता.18) मागच्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यासाठी गाव पातळीवर कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षादलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सतर्कतेने कार्य करावे असे आवाहन गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी केले.

ते शनिवारी( ता.17) ग्रामीण पोलीस स्टेशन च्या आवारात पोलीस पाटलांच्या मासिक सभेत बोलत होते.

मागच्या काही दिवसापासून ग्रामीण भागात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस विभागही आपल्या परीने रात्री ग्रस्त करून या घटनांना पायबंद घालीत आहे. तरीपण या घटनांवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी गावातील पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाची रात्र गस्तीची नितांत आवश्यकता आहे. याखेरीज गावात आलेल्या अनोळखी व संशयास्पद वागणूक असणाऱ्या व्यक्तींची माहिती नागरिकांनी तातडीने पोलीस प्रशासनाला द्यावी असे आव्हानही यावेळी त्यांनी केले.

तसेच गावात महापुरुषांचे नवीन पुतळे शासनाची परवानगी घेऊनच स्थापित करावे अन्यथा कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

सभेला ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावचे पोलीस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन कविता रंगारी यांनी तर आभार शेखर खोब्रागडे यांनी मानिले.

Related posts