कर्मचाऱ्यांच्या संप मागे, कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

589 Views  मुंबई, दि. 20 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य…

Read More

गोसेखुर्द प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य या दुहेरी कोंडीत अडकलेल्या तीन गावांचा योग्य मोबदला आणि पुनर्वसन करण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ. फुके

68 Views  प्रतिनिधी. भंडारा. जिल्ह्यातील पवनी तालुका अंतर्गत उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याला लागूनच मौजा पाहुणगाव, कवडशी, गायडोंगरी ही गावे असून, या गावांतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गावाच्या एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला मारू नदीमुळे हे गाव जलमय झाले आहे. नदीच्या धरणाच्या पाण्यामुळे येथील ७० टक्के जमीन ओली राहते. एवढेच नाही तर एका बाजूला गोसे खुर्द प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र आणि दुसरीकडे वन्यजीव अभयारण्य यामुळे हे गाव दुहेरी कोंडीत सापडले असून, दुर्दशेचे अश्रू ढाळत आहेत. याप्रकरणी ग्रामस्थांनी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची भेट घेऊन…

Read More

शेतकऱ्यांसाठी धान खरेदीस 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

198 Views  गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत    8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 4 मार्च ला, गोंदिया जिल्ह्यात, अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात कबड्डी स्पर्धा, बक्षीस वितरण, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थिति

173 Views  गोंदिया, 28 फेब्रुवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात प्रथमच 4 मार्च रोजी आगमन होत आहे. यानिमित्त माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनात दुपारी 2 वाजता विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रस्तरीय कबड्डी स्पर्धा, परीक्षा पे चर्चा स्पर्धेचे बक्षीस वितरण, धन्यवाद मोदीजी पोस्टकार्ड, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे आयोजन एसएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्धाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल. प्रमुख अतिथी म्हणून खा. सुनील मेंढे, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, विदर्भ…

Read More

‘‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’’ च्या सायकल संडे ग्रुप द्वारे जनजाग्रुती सायकल रॅली, अनेकांनी घेतला सहभाग…

802 Viewsगोदिया:- या वर्ष हे ‘‘अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’’ म्हणुन साजरे करण्यात येत आहे. या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढी सोबतच पिकांच्या आरोग्य विषयक फायद्यांन बाबत जनजागृती करून नागरिकांच्या आहारात तसेच त्यांचे प्रमाण वाढविण्यांचे प्रयत्न कृषी विभागाकडुन होत आहे. या पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषण मुल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर सकारात्मक होणारे परिणाम जन सामान्य प्रयन्त तसेच त्यांच्या लक्षात येण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गोंदिया व सायकलिंग संडे गोंदिया ग्रुप सोबत संयुक्त २६ फेब्रुवारी ला सकाळी ६ वाजे जय स्थंभ चौक गोंदिया येथुन सायकल रॅली ची सुरवात केली. गोंदिया शहरात…

Read More