गोठणपार येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा NAPF गोंदियाच्या वतीने जाहीर निषेध- करण टेकाम

681 Views

 

गोंदिया :: लोकशाहीचा उत्सव संपूर्ण जिल्हा साजरा करीत असताना मानवतेला काळिमा फासणारी घटना देवरी तालुक्यातील गोठणपार येथे आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी लग्न समारंभ करिता आली असता तिचे अपहरण करून लैगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली.

या घटनेचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन, नेशनल आदिवासी कर्मचारी फेडरेशन , आदिवासी विध्यार्थी संघ , महिला फेडरेशन , बिरसा ब्रिगेड व विविद्द सामाजिक संघटन गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदन देण्यात आला. आरोपीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पूर्णतः उदासीन आहे.

सरकारने आणि प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांच्या सुरक्षा करिता ठोस पावले उचलावी अशी मागणी सुद्धा यावेळी नेशनल आदिवासी पिपल फेडरेशनने केली .

गोंदिया जिल्हा अधिकारी यांना निवेदन देताना प्रामुख्याने नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन जिल्हा अध्यक्ष करण टेकाम. सोनुभाऊ कुथे, सभापती जि प गोंदिया, पूजाताई धुर्वे सभापती जि प गोंदिया , इंजि .राजीव ठकरेले सदस्य कृषी मंडी, सचिव नीलकंठ चिचाम , राहुल येल्ले।
आदिवासी विध्यार्थी संघ गोंदिया, टेकसिंह पुसाम अध्यक्ष कोंग्रेस कमिटी, वाय.सी.भोयर, एच.सी.भोयर, चनाप सर, शिलाताई ऊईके, महिला उपाध्यक्ष संगीता पुसाम, ललिता ताराम,पी.बी. टेकाम, रंजना उईके, दिलेश्वरी मर्सकोल्हे, संतोष मडावी, प्रशांत सिडाम,दिनेश मडावी,शुभम कुंभरे,राधेश्याम नागभीरे,शुभेलाल कुंभरे,विभिन्न आदिवासी सह समाज इतर महिला, आणि नागरिक, युवक, यावेळी उपस्थित होते.

Related posts