बांधकाम कामगारांनी खाजगी व्यक्तींपासून सावध राहावे

805 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ हे ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी, तपासणीअंती सदरचे लाभ थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले जातात. ही कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. बांधकाम कामगारांनी अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये. अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र इमारत व…

Read More

जेष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी जीवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन-14567

710 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 26/04/2023 : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ (National- Helpline For Senior Citizens १४५६७) सर्व राज्यांत सुरु करण्यात आली आहे. या राष्ट्रीय हेल्पलाईन चा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासाई राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे आणि चांगली सेवा देणे हा आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष…

Read More

गोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..

2,053 Views  गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…

Read More

गोंदिया: 27 एप्रिल ते 11 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

2,565 Views       गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश…

Read More

गोंदिया: दुर्गम मुरकूटडोह मध्ये प्रथमच पोचले प्रशासन, विविध योजनांचा दिला लाभ..

905 Views उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांचा पुढाकार, पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य            गोंदिया,दि.26  (जिमाका) : महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड सीमेवर असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या पुढाकाराने अख्खे प्रशासन प्रथमच गावात गेले आणि योजनांचा लाभ दिला. अनेक विभागाचे अधिकारी गावात पाहून नागरिकही भारावून गेले होते. एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने गावकरी व प्रशासनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.          देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून महसुल प्रशासन तर्फे तहसील कार्यालय, आधार सेंटर सालेकसा, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, सालेकसा ग्रामपंचायत, दररेकसा, जमाकुडो, आणि गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त…

Read More