339 Views
प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने
भंडारा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ हे ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी, तपासणीअंती सदरचे लाभ थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले जातात.
ही कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. बांधकाम कामगारांनी अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये. अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी कळविले आहे.