गोंदिया: जिल्हयातील 98 अंशतःअंध मुलांना लार्ज प्रिंट ची मोफत पाठ्य पुस्तके वाटप, समग्र शिक्षा चा उपक्रम

486 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। डोळ्याची दृष्टी कमी झाल्याने सामान्य पाठ्यपुस्तके वाचनात अडचणी निर्माण होतात. परिणामी त्याचा प्रभाव हा अभ्यासावर व शैक्षणीक प्रगतीवर पडतो. त्यामुळे ज्या मुलांची दृष्टी कमी झालेली आहे त्यांना त्यांच्या दृष्टी आवश्यकतेनुसार मोठ्या अक्षराची पाठ्यपुस्तके शासनाच्या बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून तयार करून दिल्या जातात.अशा गोंदिया जिल्ह्यातील अंशतः अंध असलेल्या 98 दिव्यांग मुलांना येत्या 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकाचे घरापर्यंत वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी ही सर्व मुले या पाठ्य पुस्तकांचा वापर करणार आहेत.

सर्वांना शिक्षण या हेतूने अनुसरून समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण, दिव्यांग विभागामार्फत विविध योजना अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या आणि इयत्ता 1 ली ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांकरता विविध योजना राबविण्यात येतात. यातच ज्या अंशतः अंध मुलांची दृष्टी कमी झालेली आहे त्यांना सर्वसामान्य छपायीची पाठ्यपुस्तके वाचण्यास अडथळा होतो. त्यामुळे त्याचा परिणाम अध्ययन-अध्यापन होऊन प्रगती खुंटते. अशा मुलांना त्यांच्या दृष्टी क्षमतेनुसार व गरजेनुसार मोठ्या अक्षरात पुस्तके छपाई करुन दिली जातात.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 98 अंशतः अंध मुलांना ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तकांचे वितरण समग्र शिक्षा च्या कर्मचाऱ्यांनी घरापर्यंत करून दिले असून शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुले पाठ्यपुस्तकांचा अध्यापनात लाभ घेणार आहेत या मुलांमध्ये गोंदिया तालुक्यातील 12, तिरोडा 9, आमगाव 16, सालेकसा 13, गोरेगाव 12, सडक/ 12, अर्जुनी मोरगाव 17 तर देवरी 7 अश्या एकूण 98 मुलांचा सहभाग आहे.

Related posts