गोंदियात हर घर दस्तक मुहिम: कोविड लसीकरण बूस्टर डोस करण्याकरता नियोजन

373 Views

गोंदिया। जिल्ह्यात सर्वस्तरावर गावपातळी वर कोविंड लसीकरणाचे कॅम्प आरोग्य विभागाकडून लावण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या कोविड लस सुद्धा उपलब्ध आहे. विविध माध्यमातून कोवीड लसीकरणाचा लोकांकडून प्रतिसाद मिळावा या हेतूने जनतेस आव्हान सुद्धा करण्यात येत आहे. जिल्ह्यात एक जून 2022 पासून हर घर दस्तक मोहिमेद्वारे आरोग्य कर्मचाऱ्याकडून गृहभेटी द्वारे वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन कोवीड लसीकरण करण्यात येत आहे. तरीसुद्धा लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. करिता आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे लोकांना आव्हान करण्यात येते की सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे.
जिल्ह्यात दिनांक 10 एप्रिल 2022 पासून साठ वर्षावरील तसेच 18 ते 60 वयोगटातील हेल्थकेअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर यांना बूस्टर डोस लावण्याचे सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. परंतु बूस्टर डोस लावण्याकरिता सुद्धा लोकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे करिता जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सर्व सन्माननीय पदाधिकारी, गावाचे सन्माननीय सरपंच तसेच प्रभावशाली व्यक्ती यांनी कोविंड लसीकरण कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा व कोविंड लसीकरण करून स्वतः व देशाला सुरक्षित करावे.
जिल्ह्यात 18 ते 59 वयोगटातील हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर सोडून खाजगी रुग्णालयात नियमानुसार शुल्क आकारून कोविड लसीकणातील बुस्टर डोज करण्यात येणार आहे याकरिता जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे पाठपुरावा सुरू असून याबाबतचे पत्र शासनास व संबंधितांना देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात तसेच राज्यात कोविड  केसेस वाढायला सुरुवात झालेली आहे करिता आरोग्य प्रशासनातर्फे कोविड अनुरूप वर्तन बदल तसेच कोविड लसीकरण प्राधान्याने करण्याचे आव्हान या द्वारे करण्यात येत आहे

सर्व सन्माननीय पदाधिकारी, गावाचे सन्माननीय सरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,तसेच प्रभावशाली व्यक्ती यांनी कोविंड लसीकरण कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा व कोविंड लसीकरण करून इतरांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करावे .स्वतः व देशाला सुरक्षित करावे.
 मा.नयना गुंडे                                                       जिलाधिकारी गोंदिया

कोरोना संदर्भात कुठ्लेही लक्षणे आढ्ळ्ल्यास कोरोना चाचणी करण्याचे व आरोग्य विभागा सोबत सर्व विभाग जसे शिक्षण, महिला व बाल विकास ,ग्राम पंचायत,नगर परिषद ,पोलिस ह्या सर्वानी सहयोग देवुन मोहिम यशस्वी करण्यात यावे.
मा.अनिल पाटील                                                 CEO- जिल्हा परिषद गोंदिया

संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करून घेणे, गर्दी टाळणे व नियम पाळणे हे स्वयंफुरतीने केले तरच संसर्ग आटोक्यात येऊ शकतो.
डॉक्टर नितीन वानखेडे,

                  DHO- जिल्हा परिषद गोंदिया

Related posts