गोंदिया: मुंडीपार ग्रामपंचायत सदस्याच्या श्रमदान, पतीसह केली नाली सफाई…

301 Views

 

प्रतिनिधि
गोरेगांव:-तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील सांडपाणी भरून वाहणाऱ्या नाल्या बुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात सांडपाण्याची मोठी अडचण निर्माण होईल तसेच आरोग्य व स्वच्छतेची बाब किती गंभीर आहे आणि काय वाईट परिणाम होईल या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत सदस्या सौ. छाया राजेंद्र बिसेन यांनी आपल्या पतीसह स्वतःच्या घरासमोरील नालीची साफ-सफाई केली.

जर प्रत्येक व्यक्तींनी आप-आपल्या घरासमोरील नालीची साफ-सफाई केली तर आपला परिसर स्वच्छ व निरोगी राहिल तसेच ग्रामपंचायत तर्फे साफसफाई साठी लागणारी मजुरी पण वाचविता येईल जेणे करून ती मजुरी इतर दुसऱ्या गावविकास कामासाठी वापरता येईल अशी संकल्पना मनी बाळगुन स्वतः हातात फावळा घेऊन बिसेन दांपत्यानी नालीची साफसफाई केली.

Related posts