गोंदिया: “प्रा.जयंत बनसोड यांना पीएचडी”

420 Views

 

गोंदिया: श्री. लक्ष्मणराव मानकर शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. जयंत बनसोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. ” शिक्षक नीतीतत्वाचा शालेय संघटनात्मक वातावरण आणि मुख्याध्यापकाच्या नेतृत्व वर्तन संदर्भात अभ्यास ” असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांनी हे संशोधनकार्य डाॅ. आर.एल.निकोसे, प्रोफेसर तथा कार्यकारी प्राचार्य पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय गोंदिया यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केले. त्यांच्या यशाचे संस्था सचिव तथा माजी आमदार श्री. केशवराव मानकर, डाॅ. संघी, डाॅ. पदमा राऊत, चंद्रपुर जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश बनसोड, मित्रपरीवार व हितचिंतकांनी कौतुक केले.

Related posts