महाराष्ट्राला मिळाला नवा ‘युवा ग्रँड मास्टर’, डिप्टी सीएम देवेन्द्र फडणवीस यांनी आदित्याला दिली शुभेच्छा..

505 Views
मुंबई। बुद्धिबळ खेळामध्ये अनेक राष्ट्रीय पारितोषिके मिळवून भारतात आणि जगभरात महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या आदित्य मित्तल या महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली बालकाची 3जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
मुंबईमध्ये राहणारा आदित्य मित्तल हा देशातील 77 वा बुद्धिबळ खेळातील ग्रँडमास्टर ठरला आहे. तो APR’23 च्या FIDE यादीनुसार
जगातील 11वा आणि भारतातील 4था सर्वोच्च अंडर-17 क्रमांकाचा खेळाडू आहे.
जागतिक ज्युनियर्सच्या (U-19) टॉप 100 च्या यादीत 37 व्या क्रमांकावर आहे. त्याला बुद्धिबळ खेळामध्ये अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईमधील एकमेव दुसरा ग्रँडमास्टर आदित्यच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आदित्यला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिली !

Related posts