292 Views
तुषार कमल पशिने
भंडारा: गावाहून येत असताना तोल गेल्यामुळे कालव्यात पडल्याने रवींद्र ताराचंद लाटकर (३९) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली.
रवींद्र लाटकर हे जामगाव आबादी येथे राहणार आहेत. अड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नवरगाव-रावणवाडी जलाशयाच्या कालव्याच्या मार्गाने ते पहेला वरून आपल्या गावाकडे परत येत होते. दरम्यान तोल गेल्याने ते अचानकपणे कालव्यात कोसळले. यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. विनोद लाटकर यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर अड्याळ पोलिसांनी मर्ग दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक सोरते करीत आहेत.