सामाजिक न्याय पर्व निमित्ताने नंगपुरा/मुर्री येथे स्वच्छता अभियान

317 Views

गोंदिया, दि.20 : प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल  ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “सामाजिक न्याय पर्व”चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने 19 एप्रिल 2023 रोजी विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कविता लिचडे, सरपंच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री,  अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठुले, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदियाचे सर्व कर्मचारी, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री शाळेचे गृहपाल, सर्व सहाय्यक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री चे ग्रामपंचायत सदस्यगण व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

सामाजिक न्याय व समता पर्व अंतर्गत 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री ता.जि. गोंदिया येथील इमारतीसमोरील परिसराची स्वच्छता करण्याच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय गोंदियाचे वतीने या उपक्रमात सहभागी स्वच्छता दूतांना मास्क, हातमोजे, खराटे, सुपली, हँडवॉश इत्यादी साहित्य पुरविण्यात आले. सर्वात प्रथम अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री ता.जि. गोंदिया या शाळेच्या समोरील परिसराची  स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री च्या इमारतीसमोरील परिसराची  स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता उपक्रमाअंतर्गत सदर परिसराची स्वच्छता करून स्वच्छता दूतांनी जनतेला स्वच्छतेच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.

उपक्रमाच्या सरतेशेवटी या उपक्रमाचे आयोजक विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण गोंदिया यांनी  उपस्थित ग्रामस्थांना  स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले की, “स्वच्छता“  हे आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असून त्याचा थेट संबंध आपल्या वैयक्तिक व सामाजिक आरोग्याशी येत असून त्याकडे जर लक्ष दिले गेले नाही तर त्याचा आपल्या वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून प्रत्येक नागरीकाने आपली व आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. अर्थात ती एक सामाजिक जबाबदारी असून ती प्रत्येकाने काटेकोरपणे पाळली तर प्रत्येक परिसर स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा प्रत्येकाने स्वच्छतेचे प्रण हाती घेतले पाहिजे. तेव्हाच आपण एका चांगल्या निरोगी आनंददायी  परिसराची अपेक्षा करू शकतो.”

यावर कविता लिचडे, सरपंच ग्रामपंचायत नंगपुरा/मुर्री यांनी समाज कल्याण गोंदियाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान या अभिनव उपक्रमाबद्दल विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांचे आभार मानून समाज कल्याण विभागाचे कौतुक केले.

सदर स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेकरीता धनंजय खराबे, योगेश सावरबांधे (गृहपाल), अरुण पराते, समाज कल्याण निरीक्षक स्वाती  कापसे व विद्या मोहोड, निवेदिता बघेले, आशिष जांभूळकर, अमेय नाईक, भडके, लक्ष्मण खेडकर, माणिक इरले,  शैलेश उजवणे (सर्व कर्मचारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय गोंदिया), एस.बी. बगमारे,  के.बी. बिसेन, श्रीमती ए.के. तेलंग, श्रीमती एस.पी. पारधी, श्रीमती एन.जे. भलमे, डी.ए. बनकर, हरीश बर्वे, संतोष बघेले (सर्व सहाय्यक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शासकीय निवासी शाळा नंगपुरा/मुर्री), तसेच बालू लिचडे (समाजसेवक, ग्रामपंचायत नंगपुरा मुर्री) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related posts