साकोलित कृषी विद्यापीठाची निर्मिति आणि कृषिवर आधारित मोठा उद्योग आण्यासाठी प्रयत्न शुरू- विस अध्यक्ष नानाभाऊ पटोले

188 Views

 

प्रतिनिधि।

लाखनी। साकोली येथे कृषी विद्यापीठाची निर्मिती तर लाखनी तालुक्यात कृषीवर आधारित मोठा उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता शासकीय जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना व पूर बाधित कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी याकरिता युद्धस्तरावर काम सुरू असून लाखनी तालुक्यात 3747 घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. खऱ्या अर्थाने आजच्याच दिवशी या विधानसभा क्षेत्रातील जनतेनी मला आशीर्वाद देऊन राज्याच्या संवैधानिक पदावर विराजमान केले, याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रथम वर्षपूर्ती म्हणून यानिमित्ताने आज गरीब गरजू लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देताना तसेच पूर बाधित कुटुंबीयांना शासकीय लाभ मिळवून देता आला याच्या मला आनंद आहे असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

लाखनी तालुक्यातील ग्राम राजेगाव व रेंगेपार कोठा येथे आयोजित घरकुल योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते.
ग्रामीण भागात घरकुल हा महत्त्वाचा विषय असून सर्वांना घरकुल मिळावे याकरिता शासन युद्धस्तरावर कार्य करीत आहे. ग्रामस्तरावरून प्रामाणिक रित्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे गरजेचे आहे. जनतेचे प्रश्न प्रामाणिकरित्या सोडविण्याची जबाबदारी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. स्वाभिमानाने सर्वांना जगता यावे अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून रेंगेपार येथे गाव तलावाच्या पाण्यामुळे होत असलेली पूर परिस्थिती लक्षात घेता तलावाच्या नियोजना करिता 32 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पटोले यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांच्या पिक नुकसानी करिता प्रशासकीय सर्वे सुरू असून शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात पिक विमा योजनेअंतर्गत शासकीय मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची लूट होऊ नये या करिता शासनाने गाव पातळीवर सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी केंद्राची व्यवस्था करण्याची नवीन योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. धान खरेदी केंद्र दलालासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असून या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला बोनस मिळेल व त्यांच्या मालाची प्रामाणिकरित्या खरेदी करून शेतकऱ्याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे ते म्हणाले. धान साठवणुकीसाठी अत्यावश्यक बाब म्हणून ग्रामीण परिसरातील शासकीय जागेवर गोडाउन निर्मिती करण्यासाठी गावातील पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवक व तलाठी यांच्याद्वारे शासकीय जागांची निवड करावी व तसे प्रस्ताव सादर करावे अशा सूचना देण्यात आले आहेत अशी माहिती पटोले यांनी यावेळी दिली.
यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते ग्राम राजेगाव रेंगेपार कोठा व सावरी येथील 58 घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच अतिवृष्टीत घरांची मोठी पडझड झालेल्या 17 कुटुंबियांना आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेला राबविणाऱ्या आशा वर्कर यांच्या सत्कार करण्यात आला।
यावेळी मंचावर जिल्हाधिकारी संदीप कदम, तहसीलदार मलिक विराणी, खंडविकास अधिकारी जाधव, कृषी अधिकारी पद्माकर गीदमारे, आपत्ती व्यवस्थापनचे नरेश नवघरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन दीपक काडगाये यांनी केले कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Related posts