गोंदिया: 1 नोव्हेम्बर पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प शुरू, 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश..

369 Views
हकीक़त न्यूज।
गोंदिया,दि.24 : राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता 30 जून 2020 पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार 1 नोव्हेंबर 2020 पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरु करण्यात येत आहे. त्यामध्ये 10 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पर्यटनाकरीता मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे 10 वर्षाखालील मुले जर एकाच कुटूंबातील असेल तर त्यांना पर्यटनाकरीता परवानगी राहील व एका जिप्सीमध्ये त्या कुटूंबातील 6 लोकांना बसण्याची परवानगी राहील.
    तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पर्यटनाकरीता प्रवेश देण्यात येणार नाही. त्यासंबंधी कोविड-19 ची परिस्थिती पाहून वेगळ्याने निर्णय घेण्यात येईल, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम यांनी कळविले आहे.

Related posts