गोरेगाव शहरातील पथ वाहतूक दिवे व स्ट्रीट लाईट सुरू करा- रेखलाल टेंभरे

240 Views

 

गोरेगाँव। गोरेगाव शहरात रोड चे काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले रोड व स्ट्रीट लाईट चे खांब लावण्यात आले आहेत. पण आज तारखेपर्यंत स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आली नाही.

गोरेगाव शहरातील निवासी व रोडवर ये-जा करणारे प्रवासी यांना रात्री अंधारात प्रवास करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण या संदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार विचारणा केली असता व अनेक निवेदन देऊन सुद्धा गोरेगाव ची स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आलेली नाही. जर त्वरित स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आली नाही तर कडक कारवाई करून, संबंधित विभागाला धारेवर धरू असा इशारा रेखलाल टेंभरे यांनी दिला आहे.

Related posts