गोंदिया: एलसीबी ची मोठी कारवाई, दवनीवाडा अंतर्गत निलागोंदी येथुन १३ तलवारी बाळगणारे आरोपीतांना अटक..

2,277 Views

प्रतिनिधि। 06 जुलै
गोंदिया। दिनांक २९/०६/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक, गोंदिया विश्व पानसरे यांनी गोंदिया जिल्हयात अवैध शस्त्र व हत्यारे बाळगणारे इसमांविरुध्द मोहीम राबविणेकरीता एक पथक तयार केले. सदर पथकाने गोपनिय बातमीदारांना सक्रीय करुन अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांबाबत माहीती काढणेस सांगितले असता गोपनिय बातमीदारांकडुन विश्वसनिय माहीती मिळाली की, पो.स्टे. दवनीवाडा अंतर्गत मौजा निलागोंदी येथील इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे याचे राहते घरी अवैध तलवारी असल्याची माहीती मिळाली.

दिनांक ०५/०७/२०२२ रोजी नमुद पथकाने इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे रा. निलागोंदी याचे राहते घरी अवैध शस्त्रांबाबत पंचासह रेड केली असता त्याचे घरी माज घरात एका खाकी रंगाचे खोक्यात एकुण १३ नग लोखंडी तलवार मिळुन आले. सदर तलवारीबाबत इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे यास विचारपुस केली असता सदर तलवारी त्याचा भाचा याचे असल्याचे सांगितले.

खेमलाल बुधुलाल मस्करे याचे भाचा यास विचारपुस केले असता त्याने सदर तलवारी त्यानेच घेऊन आल्याचे सांगितले. खेमलाल बुधुलाल मस्करे वय ५१ वर्ष रा. निलागोंदी व त्याचा विधीसंघषित बालक असलेला भाचा यांचेकडे शस्त्रे बाळगणेबाबत कोणताही परवाना नसतांना अवैध १३ तलवारी त्याचे ताब्यात अवैधरित्या
विक्रीकरीता मिळुन आल्याने सदर इसमांविरुध्द पो.स्टे. दवनीवाडा येथे गु.र.क्र. १९८ / २०२२ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी नामे खेमलाल बुधुलाल मस्करे वय ५१ बर्ष रा. निलागोंदी यास अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोउपनि सुखदेव राऊत, पो.स्टे. दवनीवाडा हे करीत आहेत.

सदरची कारबाई विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया, महेश विघ्ने, पोउपनि, पोना सोमेंद्रसिंग तुरकर, ओमेश्वर मेश्राम, पोशि अजय रहांगडाले, संतोष केदार, श्याम राठोड यांनी केली आहे.

Related posts