गोंदिया: गुरुवारी जिल्ह्यात तीन रुग्ण डिस्चार्ज तर दोन कोरोना बाधित..

195 Views

          गोंदिया,दि.23 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून 23 जून रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवीन दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर डिस्चार्ज रुग्णांची संख्या तीन आहे. आजपर्यंत 46,241 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 45,507 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली.

क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 12 आहे. क्रियाशील असलेले 12 बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 588 रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.40 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.27 टक्के आहे तर डब्लिंग रेट 751.5 दिवस आहे.

Related posts