गोंदिया: इम्पेरियल डेटा तयार करताना स्थानिक विविध जाती घटकातील प्रतिनिधी समोर त्यांना विश्वासात घेऊन तयार करा

323 Views

 

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

गोंदिया:- इम्पेरियल डेटा तयार करताना स्थानिक विविध जाती घटकातील प्रतिनिधी समोर त्यांना विश्वासात घेऊन तयार करा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी याबाबतचे निवेदन आज दिनांक 16 जुन गुरुवारला माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे व प्रदेश सचिव श्री विनोद हरिंनखडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले समर्थित आयोगामार्फत ओबीसी इम्पेरियल डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे हे काम ज्या पद्धतीने सुरू आहे ही पद्धत अतिशय चुकीची असून त्यामुळे ओबीसी वर प्रचंड अन्याय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आडनावावरून जात ठरविणे शक्यच नाही एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे बाबतीत जो घोळ सुरुवातीपासून सुरू आहे तो अजून पर्यंत थांबला नाही 2016 पासून टाईमपासचा घोळ सुरू केला तोच घोळ नंतर आज पावेतो सुरू आहे मतदार याद्यातील आडनावावरून ओबीसींची लोकसंख्या ठरविणे म्हणजे वेळकाढूपणा असून महाराष्ट्रातील ९६ कुळ आडनाव हे ब्राह्मण जात सोडून सर्व दलित ओबीसी जाती मध्ये आहेत आम्ही समर्पित आयोगाला दिलेल्या निवेदनात व त्या आधी अनेक वेळा प्रत्यक्ष चर्चेतही स्पष्टपणे सांगितले आहे की हा एम्पिरिकल डेटा ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी तसेच नगरपालिका, महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयात आहेत ग्रामीण भागात जात शोधायला फारशी अडचण येणार नाही कारण गावांमध्ये जातवार वस्त्या असतात व त्याप्रमाणे मतदार याद्या सुद्धा असतात आपल्या भागातील मतदारांच्या जाती कोणत्या व त्यापैकी कोणत्या जाती राष्ट्रीय दृष्ट्या मागासलेले आहेत याचा सर्व तपशील ग्रामीण ते जिल्हा पातळीपर्यंतच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना जास्त माहिती असते तरी माननीय अध्यक्ष राज्य मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्य महोदयांना विनंती आहे की वरील उपरोक्त विषयानुसार यावर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या चुकीच्या पद्धतीने इम्पेरियल डेटा गोळा करत असल्याचे निदर्शनात आणून देणे हे फार अत्यंत आवश्यक असून व वरील विषयान्वये गांभीर्य पूर्ण निर्णय घेणे फार गरजेचे असून पुढील योग्य कारवाई करिता या निवेदनाद्वारे मागणी आहे. तरी इम्पेरियल डेटा स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, सरपंच जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी तसेच नगरपालिका, महानगरपालिका यांच्यामार्फत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष पुंडकर, बाबा बहेकार, महिला जिल्हा उपाध्यक्ष मंजूताई डोंगरवार, डॉ. किशोर पारधी, डॉ.विनोद पटले, सुरेश गुर्वे, महेश कनोजिया, अशोक शहारे, सुनील पटले, प्रमोद लांजेवार ,राजू ठाकरे, संतोष रहांगडाले, अशोक गिरी, समीर कटरे , कान्हा बघेले, झनकलाल बिसेन, शंकर शहारे, बसंत गणवीर, श्याम चौरे, ऋषिपाल टेंभरे, मोहित गौतम तसेच जिल्ह्यातील ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related posts