तिरोड़ा: परसबागेतून मिळणार महिलांना रोजगार- अदानी फाउंडेशन चा पुढाकार..

607 Views

 

प्रतिनिधि।

तिरोड़ा। सेंद्रिय भाजीपाल्याची वाढती मागणी व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने याच बाबीला हेरून अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा ग्राम बेरडीपार येथील पन्नास महिलांना परसबाग लागवडीचे प्रत्यक्षिक देऊन भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले त्यासोबतच भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण तसेच सेंद्रिय खते, सेंद्रिय कीड नियंत्रक, बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले उत्पादित सेंद्रिय भाजीपाल्याला योग्य भाव मिळावा याकरिता संबंधित गावातील तीन महिलांना भाजीपाला विक्री करण्याकरिता अदानी शांती ग्राम टाऊनशीप समोर व्हेजिटेबल कार्ट अदानी फाउंडेशन द्वारा तयार करून देण्यात आले.

दिनांक 17 ऑक्टोंबर 2020 रोज शनिवार ला भाजीपाला विक्री व्यवसायाचे उद्घाटन सौ रत्ना बिश्वास मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रामुख्याने सौ राऊत मॅडम, सौ रांगणेकर मॅडम, व नव्या क्‍लबच्या सदस्या उपस्थित होत्या.

सदर व्यवसायाच्या माध्यमातून संबंधित महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उदात्त हेतूने अदानी फाउंडेशन द्वारा हा उपक्रम सुरू केला आहे असे अदानी फाऊंडेशनचे हेड श्री नितीन शिराळकर यांनी सांगितले

Related posts