जिल्ह्यातील विकास कामांसाठी २ कोटी ४० लाखांच्या कामांना मंजुरी, खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

505 Views

 

प्रतिनिधि।08 मे

भंडारा। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावाअंतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२१-२२ या वित्तीय वर्षासाठी जिल्ह्यातील विकासकामांसाठी २ कोटी ४० लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. खा.प्रफुल्लभाई पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन ग्रामीण भागातील विकासाकरीता २४० लक्ष रुपयांचा विकासकामांना शासनाने मंजुरी दिली आहे.

गावाअंतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत खा.प्रफुल्लभाई पटेल यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा केला. शासनाने खा.प्रफुल्लभाई पटेल यांनी सादर केलेल्या कामांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देऊन २४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

यामध्ये दिघोरी/मोठी येथे सिमेंट रस्ता, बेला येथे सिमेंट रस्ता, नेरी येथे सिमेंट नाली बांधकाम साखळी येथे स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता, खराशी टोली येथे सिमेंट काँक्रीट नाली, रुयाळ येथे स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता दाभा येथे सिमेंट रस्ता व नालीबांधकाम, भावड येथे सिमेंट रस्ता, लवारी येथे सिमेंट रस्ता, वाहनी येथे सिमेंट रस्ता, बारव्हा येथे स्मशानभूमीपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम, सिपेवाडा येथे नाली बांधकाम, केसलवाडा येथे सिमेंट रस्ता बांधकाम, वरठी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समाजभवन सौंदर्यीकरण, मोहरी येथे हनुमान मंदिर समोर सभामंडप बांधकाम, साखरवाडा येथे सिमेंट रस्ता, तावसी येथे सिमेंट रस्ता, पालांदूर येथे सिमेंट रस्ता, निलज बु. आबादी प्लाट येथे सिमेंट रस्ता, माटोरा येथे सिमेंट रस्ता, भुयाळ येथे सिमेंट रस्ता, चांदोरी येथे रस्त्याचे मजबुतीकरण, उमरवाडा येथे सिमेंट नाली बांधकाम, दिघोरी मोठी येथे सिमेंट रस्ता, खराशी येथे नाली बांधकाम, पारडी येथे सिमेंट रस्ता बांधकाम, नांदोरा येथे सभामंडप बांधकाम, लोभी येथे नालीवर सिमेंट कवर बसविणे, खमारी बु.येथे सिमेंट रस्ता, कांद्री येथे रस्ता व नाली बांधकाम, कोंढी गोवरी रस्त्याचे बांधकाम, उकारा येथे सभामंडप बांधकाम, खैरी दिवाण येथे स्मशानभूमी येथे सौंदर्यीकरण, रोहणा येथे सिमेंट रस्ता बांधकाम, देवनारा येथे सिमेंट रस्ता बांधकाम, ताळगाव येथे सिमेंट रस्ता, खेडेपार, लाखनी रस्ता बांधकाम, आंधळगाव येथे सिमेंट रस्ता बांधकाम, सरपेवाडा येथे सभामंडप बांधकाम, धर्मापुरी येथे सिमेंट रस्ता बांधकाम, भेंडाळा येथे स्मशानभूमी सौंदर्यीकरण आवारभिंत व शोकसभागृह, सामेवाडा येथे सिमेंट रस्ता बांधकाम, गराडा बु. येथे सिमेंट रस्ता बांधकाम, वरठी येथे सिमेंट रस्ता बांधकाम, बोरी-पांजरा सिमेंट रस्ता बांधकाम, खापा येथे रस्त्याचे मजबुतीकरण आदी कामांचा समावेश आहे.

Related posts