गोंदिया: ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३५ कोटींच्या कामांना मान्यता, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

854 Views

 

प्रतिनिधि। 8 मे

गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेल्या खा.प्रफुल पटेल यांनी शृंखलाबध्द विकासकामांना गती देण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुरूप राज्य शासनाकडे ग्रामीण भागातील गावातंर्गत मुलभूत सुविधांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात यावी, यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा केला.

यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने ६ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ४७ विकासकामांसाठी २ कोटी ३५ लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते व इतर मुलभूत सुविधांच्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने निधी मिळाल्याने जिल्हावासीयांनी त्यांचे आभार मानले.

गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याशी आपुलकी जोपासात सातत्याने खा.प्रफुल पटेल सर्वसामान्य नागरिकांशी संपर्कात राहतात. त्यातल्यात्यात कोरोना संसर्गाच्या काळातही या दोन्ही जिल्ह्यांना वार्‍यावर न सोडता सतत ते मदतीसाठी अग्रेसर राहिले. एवढेच नव्हेतर ग्रामीण भागातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचून नागरिकांशी संवाद साधण्याचे कामही त्यांनी सातत्याने सुरू ठेवले.

त्याचप्रमाणे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी जिल्ह्यातील समस्या खा.प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान ग्रामीण भागांच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाशी पाठपुरावा केला.

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसह मुलभूत सोयी-सुविधांच्या मंजुरीसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाने ६ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून एकूण ४७ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यासाठी २ कोटी ३५ लाख रूपयाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळातंर्गत मंजूर कामांना पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही देण्यात आले आहे. खा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे गोंदिया जिल्ह्यात विकासात आणखी भर पडणार आहे. यामुळे त्यांचे जिल्हावासीयांकडून आभार मानले जात आहे.
………….
४७ विकासकामांचा समावेश
ग्रामविकास मंत्रालयाकडून ६ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून ग्रामीण भागातील गावातंर्गत मुलभूत सुविधा पुरविणे लेखाशिर्षक २५१५ १२३८ या योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात ४७ कामांना मंजूरी प्रदान केली आहे. यामध्ये दोन सभागृह बांधकाम, एक रस्ता पुल, दोन आवारभिंत, एक श्मशानभुमी सौंदर्यीकरण, एक नाली बांधकाम, दोन बौध्द विहार सौंदर्यीकरण व ३८ रस्ता सिमेंटीकरणाच्या कामांचा समावेश आहे. मंजुरी प्रदान झालेल्या कामांमध्ये गोंदिया तालुक्यात १७, तिरोडा तालुक्यात ७, सडक अर्जुनी तालुक्यात ४, अर्जुनी मोरगाव ३, आमगाव ९, गोरेगाव ६ व सालेकसा तालुक्यातील एका कामाचा समावेश आहे.
………
मंजूर कामे
सिमेंट रस्ता- गोंगले, कोरणी, आलेझरी, चिचटोला, येरमडा, मुरदाडा, हिरापूर, मेंढा, बाम्हणटोला, रिसामा, कुडवा, लेंडेझरी, दागोटोला, बेलाटी, हिरडामाली, फुलचूरटोला, सोनी, चांदोरी खु., डुग्गीपार, चुटिया, निमगाव, ठाणा, रापेवाडा, कवलेवाडा, सरांडी, बोरगाव, परसवाडा, घाटटेमणी, भानपूर, मुंडीकोटा, सेजगाव, खातीटोला, सोनपुरी, कुडवा, नवाटोला, सहषपूर.
रस्ता खडीकरण : महारीटोला, गोंगले.
सभागृह बांधकाम : कवलेवाडा, आमगाव.
पुल बांधकाम : प्रतापगड
आवारभिंत : तुकूमनारायण, कुडवा.
श्मशानभुमी सौंदर्यीकरण : बाशिपार.
नाली बांधकाम : कातुर्ली.
बौध्द विहार सौंदर्यीकरण : कोचेवाही, फत्तेपूर.

Related posts