गोंदिया जिल्हा पालकमंत्री पदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नियुक्ती

810 Views

 

गोंदिया- जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या शासन निर्णयानुसार ८ जानेवारी २०२० व १२  एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयात अंशतः बदल करून गोंदिया व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पुढील प्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे. परभणी जिल्हा पालकमंत्री पदी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व गोंदिया जिल्हा पालकमंत्री पदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related posts