गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रात आमगांव नगर परिषद क्षेत्रातील निवासीयांचा अतिक्रमण

276 Views

 

आमगांव प्रतिनिधी।

आगामी 21 डिसेंबर 2021ला होत असलेलया गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकी मध्ये 17 गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रात आमगाव नगर परिषद क्षेत्रात निवास करित असलेल्या लोकांचे अतिक्रण होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. अशा अतिक्रमण करणाऱ्या विभिन्न पक्षाच्या उमेदवारांना मतदान करू नका अशी विनंती पत्रकार – इसुलाल भालेकर यांनी केली आहे.

पत्रकार इसुलाल भालेकर यांनी पुढे सांगीतले की गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रात – गोरठा, शिवणी, जवरी, बोथली,बोरकन्हार, जामखारी , पाउडदौना, बाम्हणी, पिपरटोला, सावंगी ग्राम पंचायत चा समावेश आहे, परंतु ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना महत्व न देता शहरी भागात राहणारया लोकांनी आपले मत ग्रामीण क्षेत्रात आणून पैशाच्या बळावर निवडणुक लढत आहेत. व ग्रामीण भागात राहत असलेल्या लोंकाचे वोट विकत घेण्याचे बोलले जात आहे.

नगर परिषद क्षेत्रात राहुन ग्रामीण भागातील लोकांच्या अधिकारांवर आपले अधिकार दाखवीत असलेल्या उमेदवारांनापासुन सावध राहण्याचे आह्वान ग्रामीण क्षेत्रातील मतदार बंधु – भगिनींना पत्रकार इसुलाल भालेकर यांनी केले आहे .

सामाजिक व राजनैतिक क्षेत्रात काम करीत असणारे पत्रकार इसुलाल भालेकरांच्या अनुसार गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रात आज पर्यंत बनगाव, आमगाव, रिसामा अशा बाहरी क्षेत्रातील लोकांचे वर्चस्व राहिले आहेत . त्यामुळे गोरठा जिल्हा परिषद क्षेत्राचे विकास झाले नाही.

सर्व शहरी भागातील उमेदवार जिला परिषद निवडणुकी मध्ये या ग्रामीण भागात येतात व निवडणुक संपली की पाच वर्ष ग्रामीण भागातील विकासाकडे लक्ष देत नाही. अशा उमेदवारांना निवडून देणे म्हणजे आपल्या ग्रामीण क्षेत्राचा नुकसान करने आहे. या करिता ग्रामीण क्षेत्रातील उमेदवारांना तिकीट मिळावी याची मागणी पक्ष श्रेष्टी कडे करावी.

Related posts