गोंदिया: प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्जासह जातपडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य

200 Views

 

प्रतिनिधि

गोंदिया : जिल्ह्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत तसेच ग्रामपंचायतच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रवर्गातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी या गोष्टीची काळजी घ्यावी असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने कळविले आहे. जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी व अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि देवरी नगरपंचायतच्या एकूण ५१ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होवू घातली आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती करिता ६ डिसेंबरपर्यंत तर नगरपंचायत करिता ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १३ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायतची निवडणूक होवू घातली आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रवर्गातील उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारी अर्ज रद्द हाेवू शकतो. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना या गोष्टींची काळजी घ्यावी असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने कळविले आहे.

Related posts