प्रतिनिधि।
तुमसर। आज शामाबाई लॉन तुमसर येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार राजूभाऊ कारेमोरे, श्री नाना पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकिचे आयोजित करण्यात आले.
या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी संबोधित करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास करण्यासाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांना संधी द्या.संकटसमयी श्री पटेल या क्षेत्रातील लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. शेतकरी, कामगार यांची आर्थिक उन्नती व्हावी, मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी बोनस देऊन यांच्या हिताचे कार्य श्री पटेल यांनी केले. याउलट केंद्र सरकारने महागाई प्रचंड प्रमाणात वाढवली आहे. एकाबाजूला विविध वस्तूंची दरवाढ, महागाई आणि दुस-या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. या जनविरोधी भाजपाला आगामी निवडणुकीत जागा दाखवा.
या बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार राजूभाऊ कारेमोरे, श्री नाना पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल, श्री अनिल बावनकर, श्री देवचंद ठाकरे, श्री विट्टल काहलकर सोबत सर्वश्री रामदयाल पारधी, धनेंद्र तूरकर, श्रीमती रेखा ठाकरे, श्रीमती शुभांगी रहांगडाले, के. के. पंचबुद्धे, अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, राजकुमार माटे, याशिन छवारे, विट्टल रहमतकर, सुरेश रहांगडाले, श्रीमती प्रेरणा तूरकर, श्रीमती प्रतीक्षा कटरे, श्रीमती गीता माटे, नानू परमार, राजू देशभ्रतार, गोल्डी धरले, सचिन बावनकर, गजानन लांजेवार, बोदानंद गुरुजी, देवेंद्र शहारे, पुरनमल टेकाम, मदन भगत, उमेश तुरकर, मार्कंड राणे, अरविंद राऊत, छगन पारधी, जितू तुरकर, इजराईल शेख, दिलीप सोनवणे, खेमराज रहांगडाले, संजू रहांगडाले, चंदू बडवाईक, राजन भगत, नत्थू शरणागत, पुरणमल टेकाम, कृषी खोब्रागडे, लहू पेशीने, लक्ष्मण पटले, रेखचंद शरणागत, बबलू रहांगडाले, कपिल जैन, शालिक गौपाले, नितीन गणवीर, विनोद पारधी, बबलू पारधी, प्रशांत रहांगडाले, कमलेश बोपचे, सचिन रहांगडाले, शिशुपाल गौपाले, दर्शन वाधवानी, भवानी रहांगडाले, श्रीधर हिंगे, सुखशयाम येडे, बाळू कटरे, विजय पटले, उमेश बीजेवार, बिश्राम धुर्वे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.