कवलेवाडा (गोरेगाव) येथे मा. आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न, खा. प्रफुल पटेल यांची धान खरेदी ची वचन पुर्ती

156 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया।आज कवलेवाडा (गोरेगाव) येथे सामूहिक शेती व कृषी उपज संशोधन व पुरवठा सहकारी संस्था मर्या. मोहाडी द्वारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले.

खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदी केंद्र दिवाळी पुर्वी सुरू करुन शेतकर्‍यांच्या धानाची उचल करण्यात येईल या आश्वासनाची खासदार श्री प्रफुल पटेल यांनी वचन पुर्ती करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी श्री पटेल हे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते.

खरीप हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी श्री पटेल हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते याकरिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री केवळ बघेले, श्रीप्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, बाबा बोपचे, ऋषिपाल टेभरें, आनंदराव कटरे, द्याल टेंभरे, डॉ सुरेंद्र कटरे, मनोहर ठाकरे, मोहन ठाकरे, टोळीराम ठाकरे, होमेन्द्र खोब्रागडे, मनोज ठाकरे, इंद्रराज टेम्भरे, प्रफुल शेंडे, दुरेंद्र ठाकरे, नैतराम रहांगडाले, गुन्नीलाल चौधरी, यादोराव तांडेकर, तेजराम कटरे, नागोराव तांडेकर, ब्रिजलाल ठाकूर,प्रीतम ठाकरे, जुगराम रहांगडाले, धारजी तुरकर, प्रतीक पारधी, पप्पू रहांगडाले, सतीश ठाकरे, वामनराव गोळगे, परमेश्वर बोपचे, विनोद ठाकरे, योगराज कटरे, बाबा कटरे, निलेश कटरे, योगराज खोब्रागडे, भिवलाल खोब्रागडे, बल्लू तांडेकर, बल्लू कटरे, रमेश उईके, बाबा ठाकरे, भीमराज बिसेन, वासुदेव चौधरी, मेवालाल रहांगडाले, उमेश ठाकरे, बंडू राऊत, कोमल कटरे, सहित मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts