पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते फुलचूर (गोंदिया) येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन..

499 Views

 

प्रतिनिधि। 30 अक्तूबर

गोंदिया। दिवाळी पुर्वी धान खरेदी केंद्र सुरू करुन शेतकर्‍यांच्या धानाची उचल करण्यात येईल या आश्वासनाची खासदार प्रफुल पटेल यांनी वचन पुर्ती करीत आज गोंदिया तालुक्यातील फुलचूर येथे किसान लाख व कृषी उपज सह.संस्था मर्या. फुलचूर ( गोंदिया ) शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन ना. नवाब मलिक यांच्या हस्ते संपन्न झाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी श्री पटेल शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते. खरीप हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी श्री पटेल हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते याकरिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करीता येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यात आला.

यावेळी नवाब मलिक यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी नैना गुंडे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, देवेंद्रनाथ चौबे, नरेश माहेश्वरी, नागेंद्रनाथ चौबे, रेखलाल टेंभरे, बिट्टू बिसेन, नंदू अग्रवाल, संजय अग्रवाल, देवांश चौबे, पियुष अग्रवाल प्रणय चौबे, भुवनेश चौबे, कचरू शर्मा, ओमप्रकाश पटले, राहुल गौतम, टेंभरे जी सहित पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts