सरपंच महासंघ तिरोडा च्या उपोषणस्थळी माजी आमदार राजेंद्र जैन यांची भेट

217 Views

 

प्रतिनिधि।

तिरोडा। तिरोडा येथे सुरू असलेल्या सरपंच सेवा महासंघ च्या आंदोलनाला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

पंचायत समितीच्या पटांगणावर विविध मागण्यांसाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री नितेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असुन या आंदोलनात तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीचे सरपंच सहभागी झाले असून मोठ्या संख्येने महासंघाचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुल योजनेत ज्यांचे नाव समाविष्ट झाले नाहीत त्यांच्या नावाचा समावेश करणे, प्रपत्र “ड” चे पोर्टल सुरु करणे, रोजगार हमी योजनेतील कुशल कामाचे देयिके त्वरीत देणे व शेतकर्‍यांच्या विविध मागण्यां अशा प्रकारच्या एकुण लोकहिताच्या १७ विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. जनसामान्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी व जनतेची बहुतेक कामे अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणा मुळे रखडलेले आहेत हि कामे अधिकार्‍यांकडुन पुर्ण करण्यासाठी सरपंच सेवा महासंघ चे आंदोलन सुरू आहे.

या भेटी दरम्यान माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री जिब्राईलखान पठाण, अजय गौर, डॉ.अविनाश जायस्वाल, प्रभु असाटी, नरेश कुंभारे, बबलु ठाकुर, राजु एन जैन, राजेश गुणेरिया, विजय बुराडे, जगदीश कटरे, प्रशांत डहाटे आणि सरपंच महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts