भंडारा: पवनी तालुक्यातील भाजपाचे माजी शहर व तालुका अध्यक्ष श्री हरीश तलमले सह, असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत प्रवेश

205 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा। देशाचे लाडके नेते व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन पवनी तालुक्यातील असंख्य भाजपचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

प्रवेशावेळी भंडारा-गोंदिया जिल्हयाचे माजी आमदार श्री राजेंन्द्र जैन, भंडारा जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष श्री नाना पंचबुद्वे, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव श्री धनंजय दलाल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष श्री सुनील फुंडे, श्री देवेंन्द्रनाथ चौबे, भंडारा महिला जिल्हाध्यक्षा सौ. सरीताताई मदनकर, भंडारा तालुका अध्यक्षा सौ. मंजुषा बुरडे, कृषी उत्पन्न बाजार समीती पवनीचे सभापती तथा पवनी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री लोमेश वैद्य, जिल्हा युवक अध्यक्ष श्री यशवंत सोनकुसरे, श्री मुकेश बावनकर, श्री शैलेष मयुर, श्री चेतन डोंगरे, श्री सुरेश सावरबांधे, श्री. छोटु बाळबुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी शहर व तालुका अध्यक्ष श्री. हरीश तलमले यांचे भाजपचे सहकारी माजी युवा मोर्चा महामंत्री पवनी श्री बंटी आंबेकर, माजी महिला अध्यक्षा पवनी सौ. पुष्पाबाई बावनकर, युवा मोर्चा माजी अध्यक्ष श्री नितीन नागपुरे, बुथ प्रमुख प्रभाग क्र. 5 श्री रमाकांत जांभुळकर, बुथ प्रमुख प्रभाग क्र. 8 श्री तेजराम मुंडले, श्री अनिकेत सावरकर, श्री अनिल जांभुळकर, श्री जगदीश देशमुख, श्री विक्की देवतळे, श्री अविनाश गुरतुले, श्री मयुर वाढई, श्री राहुल हटवार, श्री बिरज बोरूले, श्री सचिन सोमनाथे, श्री सौरभ काळे, श्री अषोकभाउ दवळे, श्री संघर्ष खापर्डे, पुजा शास्मकार, शालीनी दळवे, श्री. प्रशांत मोहरकर, श्री राकेश डहारे सह मोठया असंख्य संख्येने पवनी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्तांचा प्रवेश करण्यात आला.

त्यावेळी माजी आमदार श्री राजेंन्द्र जैन, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, श्री नाना पंचबुद्वे, श्री सुनील फुंडे, सौ. सरीताताई मदनकर, श्री लोमेश वैद्य यां सर्वानी मार्गदर्शन केले, तसेच माजी आमदार राजेंन्द्र जैन त्यांनी तालुका अध्यक्ष श्री लोमेश वैद्य यांचे कौतुक केले व पवनी तालुक्यामध्ये निश्चितच या प्रवेशामुळे पवनी तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला व त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिका-याचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

Related posts