प्रथम प्राधान्याने दिव्यांग मुलांना सेवा प्रदान करूया – आमदार विनोद अग्रवाल

126 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। दीव्यांग बालकांना समाजात सन्मानाने जगता यावे व त्यांना त्यांचा मुलभूत हक्क मिळावा यासाठी प्रथम प्राधान्याने जिल्हयातील अश्या सर्व मुलांना सेवा प्रदान करूया असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ते सर्व शिक्षा अभियानाच्या मार्फत आयोजीत दिव्यांग विदयार्थी साहित्य मोजमाप शिबिरात भेट देते वेळी आपले मत व्यक्त केले.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात चार दिवसीय साहित्य साधने मोजमाप शिबिर कुडवा येथील शाळेत आयोजीत करण्यात आले होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल त्यांच्या दौऱ्यानिमित्य कुडवा येथे आले असता शिबिराची माहिती कळताच शिबिराला भेट देऊन विदयार्थी व पालकांशी संवाद साधला. व दिव्यांग मुलांना सेवा प्रदान करण्यास मी आपल्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिव्यांग विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांना दिली.

शिबिरात आज अर्जूनी/मोरगांव, तीरोडा, गोरेगांव व सडक अर्जुनी तालु्कयातील 110 मुलांनी हजेरी लावून विविध साहित्यासाठी आपली नोंदणी केली.

Related posts