ग्राम कोटरा येथे कोरडवाहू शेती अभियानच्या सभेचे आयोजन..

196 Views

 

प्रतिनिधी / सालेकसा

ग्रामपंचायत कोटरा येथे दिनांक 30/8/2021रोज सोमवारला महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी सालेकसा मार्फत सन 2020- 21करिता सालेकसा तालुक्यातील मौजा कोटरा येथे कोरडवाहू शाश्वत शेती अभियान (RAD) या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सीमाताई कोटांगले सरपंच ग्रामपंचायत कोटरा हया होत्या. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत मंडळ कृषी अधिकारी सालेकसा श्री झेड. एम.कांबळे, कृषी सहाय्यक सुभाष नागदेवे, उपसरपंच नरेंद्रजी दोनोडे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम भांडारकर, रोजगार सेवक श्री असोकजी कोटांगले, कृषी मित्र मोतीरामजी भांडारकर, बाळकृष्ण भोयर, राजू फुंडे, श्रीराम महारवाडे, किसन हत्तीमारे, राधेश्याम शेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुभाष नागदेवे कृषी सहाय्यक यांनी केले कार्यक्रमांमध्ये (RAD) संबंधित विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले अशाप्रकारे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Related posts