गोंदिया: विदर्भ स्वतंत्र झाल्याशिवाय विदर्भातील जनतेचा विकास असंभव- राम नेवले

305 Views

 

सालेकसा येथे स्वतंत्र विदर्भ राज्या करता गर्जना, बाईक रैली काढण्यात आली, वेगळा विदर्भ झाला पाहिजे, लेके रहेंगे विदर्भ राज्य लेके रहेंगे यांचे लागले नारे..

प्रतिनिधि।

सालेकसा: 21 ऑगस्ट शनिवार ला स्वतंत्र विदर्भ राज्याकरता सालेकसा (जिल्हा:-गोंदिया) येथे युवराज उपराडे यांच्या नेतृत्वात दुपारी 11.30 वाजता सालेकसा शहरात बाईक रैली काढण्यात आली, शहरातील गिरोला रेल्वे फाटकापासून ही बाईक रैली शुरु होऊन वेगळा विदर्भ झाला पाहिजे, लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज्य लेके रहेंगे, सालेकसा के युवाओ ने ललकारा हैं विदर्भ राज्य हमारा हैं, जय विदर्भ आदी नारे लावात लावत शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्टॅन्ड, तहसील-मुख्य पोलीस स्टेशन व मुख्य रस्त्याने होत ही बाईक रैली सालेकसा विश्राम गृह येथे पोहचली, विश्राम गृह येथे विराआस मुख्य संयोजक राम नेवले यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली.

विश्राम गृह येथिल बैठकीला ला मुख्य संयोजक राम नेवले यांनी संबोधित करताना सांगितले की विदर्भ स्वतंत्र झाल्याशिवाय विदर्भातील जनतेचा विकास असंभव आहे, ग्रामीण भागेतील पलायन थाम्बवायचं असेल तर सालेकसा च्या बॉर्डर ला लागलेल्या छत्तीसगड प्रमाणेच आम्हाला आमचे राज्य मिळवायला हवे, त्या करता युवकांनी मोठ्या संख्येने सामील झालेच पाहिजे, 2023 पर्यंत आम्ही स्वतंत्र विदर्भ मिळणार ही शाश्वती देण्यात आली.

विदर्भ प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी सुद्धा आपल्या भाषणा दरम्यान सालेकसा तालुक्यात नक्सलवाद्यांच्या वाढत असलेल्या गतिविधी बाबत पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आजवर केलेल्या विदर्भावर अन्यायाला जवाबदार मानले, विदर्भाच्या हिस्यातील वाटा पश्चिम महाराष्ट्र कडे वळवला म्हणून विदर्भात बेरोजगारी निर्माण झाली व युवकांचे पलायन वाढले असे सांगितले. त्याचप्रमाणे नागपूर शहर महासचिव नरेश निमजे, सामाजिक कार्यकर्ते युवराज उपराडे, उमाप्रसाद उपराडे यांची भाषणे झालीत, छोटेखानी बैठकीचे संचालन महेंद्र रंगारी यांनी केले.

बैठकी दरम्यान युवराज उपराडे यांची सालेकसा तालुका अध्यक्ष, महेंद्र रंगारी यांची उपाध्यक्ष,उमाप्रसाद उपराडे यांची महासचिव, डोमनसिंह नागपूरे यांची बिझली गाव प्रमुख, कृष्णकुमार उके यांची गोवारीटोला गाव प्रमुख, सुरेश मोहरे यांची मुंडीपार गाव प्रमुख व प्रमोद लिल्हारे यांची उपाध्यक्ष बिंजली गाव उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बैठकीला विक्रम लिल्हारे, योगराज नागपुरे, ऋषी उपराडे, यशवंत जामूरकर, बाल्या तांबोरे, अजय लिल्हारे, नितेश सुलाखे, सोनू सुलाखे, नन्नू वैष्णव, विक्रम लिल्हारे, अजय राऊत, दिनेश तांडेकर, कमलेश लिल्हारे, राहुल नागपुरे, अर्पित देकवार, मुन्सी उपराडे, संजय नागपुरे, अमर उपराडे, सुशील बोहरे, नितेश पटले सह 35-40 युवा उपस्थित होते.

स्वतंत्र विदर्भ राज्याकरता व कोरोना काळातील वीज बिल संपवण्यात करता संपूर्ण विदर्भात होऊ घातलेल्या 26 ऑगस्ट 2021 ला होणाऱ्या रस्ता रोको व जेल भरो आंदोलन सालेकसा येथे सुद्धा शेकडो युवकांच्या सहभागेत युवराज उपराडे याच्या नेतृत्वात होणार आहे असे ठरले.

Related posts