12 वर्षापासून प्रलंबित कटंगी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना सुरू- आ.रहांगडाले यांच्या मध्यस्थीने 50 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा

210 Views

 

प्रतिनिधि। 23 जुलै
गोरेगाव: तालुक्यातील कटंगी मध्यम अंतर्गत गणखैरा लघु कालव्याकरिता ३१ गटातील आराजी ४.४० हे.आर.जमीन शेतकऱ्यांनी सन २००३ मध्ये संपादित केली असून त्यापैकी २८ शेतकऱ्यांनी मोबदला उचल केले होते.परंतु ३ शेतकऱ्यांनी मोबदला उचल केला नसून गट क्रमांक ८०४/१ चे क्षेत्र संपादन क्षेत्रात येत असून त्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानतरही पाईप मध्ये कॉन्क्रेट व माती भरून काही शेतकऱ्यांकडून काम होत असल्यामुळे लघु कालव्याच्या शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नसल्याने वारंवार शेतकऱ्यांकडून सिंचनाची सोय उपलब्ध करण्याबाबतची मागणी होत होती परंतु सदर प्रकरण मार्गी लागु शकले नाही.

२००९ पासून प्रलंबित सदर प्रकरणाबाबत शेतकऱ्यांनी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचेकडे मागणी केली असता दिनांक २७/०७/२०२० ला आमदार महोदयांनी जिल्हाधिकारी यांचेसोबत संबधित विभागाची संयुक्त बैठक बोलावून प्रकरण मार्गी लावण्याबाबत आदेशित केले होते. परंतु सदर पाणी देण्यासंदर्भात काही आक्षेपित इसमांनी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करून काम अडविले होते त्यावर पुन्हा आमदार महोदयांनी सदर बाब जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून प्रकरण अंतिम मार्गी लावले व गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित कटंगी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याकरिता डावा कालवा बांधकामाच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रत्यक्ष तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, दुर्गा ठाकरे, बँक संचालक रेखलाल टेम्भरे, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, माजी प. स. सदस्य पुष्पराज जनबंधु, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बबलू बिसेन,सरपंच धाराबाई तुप्पट, उपसरपंच राजू मोहोबे, अनंता ठाकरे,मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, सहायक अभियंता श्री सचिन मडकाम, शाखा अभियंता राजेश भैरम,राजेश रहांगडाले, मोहन दाणे, भुपेंद्र पारधी, खुनीलाल पारधी, शेतकरी श्यामकुवर पारधी, रोशनलाल ठाकरे, चमनलाल पारधी, जीवेंद्र पारधी व पोलिस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related posts