स्वच्छतेसाठी होणार अत्याधुनिक कचरा गाड्या चा वापर, माजी नगराध्यक्ष इंजि. आशिष बारेवार यांच्या प्रयत्नांना यश

436 Views

 

तीन टाटा कंपनीचे हॉपर टिपर कचरा गाड़ी नगरपंचायतीला उपलब्ध..

प्रतिनिधि। 15 जुलै

गोरेगांव. मागील काळात तत्कालीन नगराध्यक्ष आशीष बारेवार यांच्या प्रययत्नाने जुलै 2019 मध्ये भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन तसेच महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 14 वित्त आयोग अंतर्गत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट च्या डीपीआर मध्ये नगरपंचायत गोरेगावला निधी मंजूर करण्यात आला होता.

त्यामध्ये फोर व्हीलर हॉपर टिपर नगरपंचायतीला खरेदी करण्याकरिता परवानगी मिळालेली होती. परंतु मिळालेल्या परवानगी मध्ये ही गाडी BS4 मानका ची होती परंतु भारत सरकारने BS4 गाड्या बंद करून BS6 गाडी बाजारपेठेत आणल्यामुळे या गाड्यांच्या खरेदीमध्ये विलंब झाला. परंतु या त्रुटी ला दुरुस्त करण्यासाठी माजी नगराध्यक्ष इंजि आशिष लक्ष्मीकांत बारेवार यांनी आपल्या कार्यकाळात पाठपुरावा करून नगर पंचायत प्रशासनाला ह्या गाड्या तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते.
पन कोरोना महामारी च्या प्रादुर्भाव मुळे लगलेल्या लॉकडाउन मुळे विलंब वाढत गेला व त्या अनुषंगाने तीन टाटा कंपनीचे हॉपर टिपर नगरपंचायतीला आज दिनांक 14 जुलै 2021 ला प्राप्त झाले आहेत.

सदर अत्याधुनिक गाड्यामुळे गोरेगाव शहरातील स्वच्छता राखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला खूप मोठि मदत होणार आहे.

या गाड्यांची क्षमता 2.5 क्युबिक मीटर कचरा एकावेळेस नेण्यासाठी आहे. या गाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या गाडीमध्ये कचरा खाली करण्यासाठी हायड्रोलिक सिस्टम लावण्यात आलेला आहे.त्यामुळे कचऱ्याला लवकर डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेउन अनलोड करण्यास मदत होईल.
या गाडीमध्ये स्पीकर ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे कचरा गाडी आपल्या घरा समोर आल्याची सूचना पूर्वक जाणीव शहरातील लोकांना होण्यास व घन कचऱ्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन होण्यास मदत मिळेल. प्रत्येक 750 घरांवर एक कचरा गाडी अशी व्यवस्था नगरपंचायती द्वारे करण्यात येणार आहे. शहरात तीन विभाग पाडून तीन गाड्यांना लवकरच सेवेमध्ये नगर प्रशासन आणणार आहे. सध्या परिस्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे घनकचरा व्यवस्थापन करीता शासनाकडून प्राप्त होणाऱ्या 14 व 15 वित्त आयोग निधी मागील वर्षा च्या तुलनेत कमी निधि मिळाल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आलेली होती. त्यामुळे प्रत्येक वार्डात कचरा कुंडी मध्ये कचरा जास्त प्रमाणात साठा होत आहे आणि ते स्वच्छ करण्याकरिता ट्रॅक्टर च्या मदतीने सफाई कामगारांना वेड लागत होता. तसेच हात रिक्षाने शहरापासून डम्पिंग ग्राउंड पर्यंत कचरा पोहोचविन्या मध्ये खूप वेळ वाया जात आहे. तसेच खूप कमी प्रमाणात कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचत होता. त्यामुळे आता या अत्याधुनिक गाड्यांमुळे कमी वेळेत जास्त कचरा गोळा करण्यात नगरपंचायतला यश मिळेल.

या गाड्यामध्ये जीपीएस सिस्टिम लावण्याची मागणी मागच्या काळामध्ये इंजी. आशीष बारेवार यांनी मुख्याधिकारी यांना केली होती. त्या अनुषंगाने ही कचरा गाडी प्रत्येक प्रभागात कोणत्या वेळेत फिरली व कचरा गोळा केला याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नगरपंचायती ला प्राप्त होईल. तसेच लोकांची तक्रार कमी होईल लवकरच या अत्याधुनिक गाड्यांची सेवा गोरेगावच्या नागरिकांना मिळेल.

या अनुषंगाने नगरपंचायत माजी उपाध्यक्ष सुरेश राहंगडाले, हीरालाल राहंगडाले,सर्व माजी नगरसेवक, प्रशासक श्री. अजय नष्टे, मुख्याधिकारी हर्षला राणे, स्वच्छता विभाग प्रमुख आशुतोष कांबले, सर्व कर्मचारींचा व शहरातील नागरिकांना या सेवेसाठी अभिनंदन माजी नगराध्यक्ष आशिष लक्ष्मीकांत बारेवार यांनी केले आहे.

Related posts