तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बैठक संपन्न, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे-माजी आमदार राजेंद्र जैन

205 Views

 

प्रतिनिधि।

तिरोडा: आज तालुका तिरोडा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गजानन महाराज मंदिर परिसर, तिरोडा मध्ये पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक पार पडली. पक्ष संघटन, पक्षाची बांधणी, बुथनिहाय चर्चा, आगामी पं.स., जि.प.व तिरोडा नगरपंचायत निवडणुका बाबद क्षेत्र निहाय चर्चा तसेच परिसरातील समस्यांवर कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी सुचविलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार श्री जैन म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकर्‍यांच्या मालाला उचित भाव मिळण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी नेहमी शेतकर्‍यांना न्याय देण्याचा काम केले आहे. खरीप हंगामातील बोनसचा प्रश्न सुद्धा मार्गी लावुन मार्केटिंग फेडरेशनला पैसे मिळाले असून लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात बोनस जमा होईल.

श्री जैन म्हणाले, आज राज्याच्या नगर विकास मंत्रायलयात गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत रखडलेल्या विकास कामांना घेऊन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करीत दोन्ही जिल्यातील नागरी क्षेत्रातील विकास कामे मागील सरकारच्या काळात निधी अभावी रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचे काम श्री प्रफुल पटेल जी करीत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकर्‍यांच्या मशागतीचा व बी – बियाणांचा खर्च दुपटीने वाढलेले आहे. केंद्र सरकारच्या जुलमी धोरणांना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असुन पक्ष संगठन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता सक्षम असणे आवश्यक आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी गावा- गावात बुथ कमेटी स्थापण करुन संगठन मजबूत करणे, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व सामान्य गोर गरीब जनतेचा पक्ष आहे हे लोंकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावे.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर व श्री खुशाल बोपचे जी यांच्या सह वरिष्ठ मान्यवरांनी पार्टी संगठन मजबुतीने कार्य करण्यासोबतच बुथ पातळीवर पक्ष संघटन बाबद चर्चा व मार्गदर्शन केले.

यावेळी माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, यांच्यासोबत सर्वश्री विजय शिवनकर, खुशाल बोपचे, सौ. राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, योगेन्द्र भगत, सौ. जया धावडे, किरण बंसोड, कैलाश पटले, मनोज डोंगरे, सौ. सुनीता मडावी, सौ. नीता राहगडाले, डॉ. किशोर पारधी, वा. टी. कटरे, उमेश अंबुले, नितेश खोबरागड़े, सौ. सविता पटले, जगन धुर्वे, ओमप्रकाश अंबुले, सौ. संध्या गजभिये, रामसागर धावडे, नत्थू अंबुले ,नरेश असाटी, राजकुमार केशरवानी, राजु ठाकरे, किशोर कुंभरे, बाळाराम साठवणे, नितीन बिसेन, टेकलाल सोनवणे, अशोक भडारकर, गजानन तिडके, डॉ मनोहर पटले, अशोक इंदूरकर, सौ. सरिता पटले, अजय बारापात्रे , जगदीश बावथडे, भूपेंद्र पारधी, परशराम बिसेन, अरविंद येडे, रमेश भोयर, राजेश टेकाम, उमललं पटले, बाबुराव डोमळे, मच्छिन्द्र टेमभेकर, प्रशांत चोडलवार, मोरेश्वर ठाकरे, ओमप्रकाश रहांगडाले, विनोद कुकडे, महेश कुकडे, प्रभुदयाल बिसेन, भोजराज उईके, तुळशीदास जांभुळडकर, दिनेश बोदेले, विट्टल पटले, रवींद्र बर्वे, दिलीप भैरम, बालकदास कुंभरे, भाऊराव बावनकर, सुखदेव बिसेन, गणराज बिसेन, संजय चुटे, छोटेलाल बिसेन, सुधाकर मेश्राम, प्रेमलाल पारधी, राजू दमाहे, अरुण भुरे, किरण पारधी, आशिष चौधरी, नवीन साखरवाडे, रवी पटले, धर्मराज पटले, वासुदेव वैद्य, ताराचंद नखाते, राजकुमार उके, महेश पटले व आदी कार्यकर्ता मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related posts