आम्ही ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण जेव्हा पर्यंत मिळत नाही तेव्हा पर्यंत निवडणुका होऊ देणार नाही-पालकमंत्री नवाब मलिक

253 Views

 

कार्यकर्तांनों पक्षाचे जनहिताचे धोरण जनते पर्यंत पोहचवावे … 

प्रतिनिधि।

तिरोडा। आज तिरोडा येथे ना. नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक कुंभारे लाँन येथे आयोजित करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ना. श्री नवाब मलिक म्हणाले कि येत्या निवडणुकांमध्ये खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात तिरोडा नगर परिषद, पंचायत समिती,व जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सत्तेत राहील यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. कोरोना काळात राज्य सरकारने योग्य नियोजन करून कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम केले आहे. तसेच शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील धान खरेदी केला जाईल, शेतकऱ्यांना बोनस लवकरच मिळेल.

पालकमंत्री श्री मलिक म्हणाले, भारतीय जनता पक्षाची सरकार राज्यात होती व सध्या केंद्र सरकार भाजपाचीच आहे तेव्हा ओबीसी समाजाला आरक्षण देण्या संदर्भात काय केले, आताच ओबीसी चा कसा पुळका आला, मंडल आयोग द्वारा आरक्षण लागू केल्यानंतर देशात सर्वात प्रथम तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादी कांग्रेस सर्वेसर्वा मा. श्री शरद पवार जी यांनी आरक्षण लागू केला. आम्ही ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण जेव्हा पर्यंत मिळत नाही तेव्हा पर्यंत निवडणुका होऊ देणार नाही.

ते पुढे बोलताना म्हणाले, सत्तेपासून दूर झाल्यामुळे नैराश्य आलेल्या भाजपा व अन्य विरोधी नेते महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. आघाडी सरकार सध्या सर्व पातळ्यांवर उत्तम कार्य करीत असुन हे विरोधकांना खुपत आहे.

यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले कि, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी श्री प्रफुल पटेल यांचे हात मजबूत करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने काम केल्यास येणाऱ्या निवडणुकीत चित्र वेगळे पाहायला मिळेल, आणि हर घर हर पल राष्ट्रवादीचा मंत्र कार्यकर्त्यांनी अंमलात आणावा.

या बैठकीत मा. ना. श्री नवाब मलिक यांच्या सोबत पूर्व आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, खुशाल बोपचे, विजय शिवनकर, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, गंगाधर परशुरामकर, लोकपाल गहाणे, प्रेमकुमार रहांगडाले, मनोज डोंगरे, कैलास पटले, सुनीता मडावी, किशोर तरोणे, रविकांत बोपचे, निता रहांगडाले, रफीक खान, जया धावडे, डॉ अविनाश जायस्वाल, जीबराईल खान पठान, नरेश कुंभारे, जगण धुर्वे, डॉ किशोर पारधी, डॉ सुशील रहांगडाले, प्रभू असाटी, यशवंत परशुरामकर, विजय बुराडे, राजु केशरवाणी, मनोहर राऊत, किरण बन्सोड, माया भगत, सविता पटले, राजु ठाकरे,राजेश तुरकर, किरण पारधी, नितेश खोब्रागडे, धमेंद्र बोपचे, अनिल भगत, बालु तिडके, भुमेश्वर रंगारी, कुवरलाल रहांगडाले, आनंद बैस, हेमराज अंबुले, जगदीश बावनथडे, राजेंद्र पटले, उमालाल पटले, भवानी बैस, आसु पटले, वसीम बैस,जगदीश कटरे,सोनाली श्रीरामे, ममता हट्टेवार शाइन मिर्जा, नत्थु अंबुले, संध्या गजभिये, राजेश श्रीरामे, डॉ मोहित गौतम, डॉ प्रदीप रोकडे, रामकुमार असाटी , रामसागर धावडे, डोमडे काकाजी, टूनडीलाल शरणागत, राधेश्याम नागपुरे, राजू एन जैन व आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts