तिरोडा येथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन पालक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते संपन्न,गरीब गरजवंतांना मिळणार निःशुल्क भोजन

164 Views

 

प्रतिनिधि।

तिरोडा। राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गोरगरीबांकरिता महत्वाकांक्षी शिव भोजन केंद्राचा लाभ भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजु लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार श्री प्रफुल्ल पटेल सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने दोन्ही जिल्ह्यात शिव भोजन केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
आज श्री भोजनालय, चंद्रभागा नाका, तिरोडा येथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन पालक मंत्री ना. श्री नवाब मलिक यांच्या शुभ हस्ते व माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून गरीब व गरजवंताना भोजन मिळणार आहे. कोरोणा संक्रमणाच्या संकट काळात परिसरातील गरीब लोकांना निःशुल्क भोजन मिळणार असल्याने संकटकाळात कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहणार नाही याकरिता शिव भोजन केंद्राचा लाभ गरजवंतानी घ्यावा असे आवाहन श्री मलिक यांनी केले.

यावेळी श्री मलिक सोबत सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, अजय गौर, राजलक्ष्मी तुरकर, जिब्राइल खान पठाण, नितीन लारोकर, प्रभु असाटी , विजय बुराडे, ओमप्रकाश येरपुडे, सलीम झवेरी, मनोज बावनकर, गायकवाड सर, संदिप खनंग, अजय तोमर, सलीम घानीवाला, राजा पठाण, युनुस भाई, तौफीक भाई, बबलु तूरकर, प्रश्नु केशरवाणी, प्रशांत डहाट, पप्पुभाई पटेल, किरण बन्सोड, बालु बावनथडे, राजू ठाकरे व अन्य उपस्थित होते .

Related posts