गोंदिया: मदतीचा हात घेऊन प्रशासन तुमच्या पाठीशी…मोहारे कुटुंबीयांना जिल्हाधिकारी खवले यांचे धाडस

705 Views

 

जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्रतून प्रतिसाद…मोहारे कुटुंबास मिळणार प्रत्येक माह 10 हजाराची मदत

गोंदिया 19 : नागरिकांच्या सहयोगाने समाजात एखाद्या दुर्बल घटकाला मदतीचा हात मिळाला की हिंदी चित्रपटाचा हा गीत साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाए तो, मिलकर बोझ उठाना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुंडीपार गावाच्या मोहारे कुटुंबीयांवर सिद्ध झाले. दि.13 जून 2021 रोजी मोहारे कुटुंबावर मोठी आपत्ती आली. सदर घटनेत त्यांची पत्नी व मुलगा या दोन्हीचा मृत्यू झाला. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सदर कुटुंबीयांची हालाखीची परिस्थिती सामोर आली.

मोहारे कुटुंबातील कुटुंबप्रमुख दिलीप मोहारे यांना शेतावर फवारणी करताना अपंगत्व आले होते. तेव्हापासून पत्नी सत्वनबाई यांच्यावर कुटुंबाचा गाडा खेचण्याची जबाबदारी आली. परंतु दुर्दैवाने 13 जून 2021 च्या मध्यरात्री सर्पदंशाने सत्वनबाई व मुलगा दिपक मोहारे या दोघांचा मृत्यू झाला. कुटुंबावर अचानक अवकळा आली, हे वृत्त सामोर आल्यावर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्हा प्रशासनाकडून सदर कुटुंबास हातभर लावण्याचे निर्धार केले. *एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ब्रीद वाक्यातून* जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या साह्याने दरमाह 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिलीप मोहारे यांच्या कुटुंबाला देण्याची गवाही जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आज दिनांक 19 जून 2021 रोजी मोहारे कुटुंबाला भेटी दरम्यान दिली.

जिल्हाधिकारी खवले यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील जवळपास 50 अधिकारी यांनी पुढाकार घेतला, एवढेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळपास दीडशे अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात मदतीचा हात सामोर आलं.

जिल्हा प्रशासनाकडून आज दिनांक 19 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सदर कुटुंबास भेट देऊन त्यांना धाडस दिले व 20 अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन दहा हजार रुपये रोख कुटुंब प्रमुखांना दिले. तसेच सदर कुटुंबास दर महिन्यात दहा हजार रुपये प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या खात्यात जमा होतील असे सांगितले.

यावेळेस उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार शरद कांबळे, अधीक्षक प्रवीण जमधाडे, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी यावेळेस कुटुंबाशी संवाद साधून शासनाच्या विविध योजना व त्यांचे लाभ तसेच रोजगार निर्मितीकरिता शासनाकडून आवश्यक मदत देण्याची गवाही दिली. तसेच दिव्या व गायत्री या दोन्ही मुलींच्या शिक्षणासंबंधी चर्चा करून पुढील आवश्यक शिक्षण व त्यावर येणारा सर्व खर्च भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून पुणे येथून करण्याचे आश्वासन ही दिले. रेशन कार्ड, जाती प्रमाणपत्र, पेन्शन योजना इत्यादीबाबत सांगून जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे असे आश्वासन देऊन नागरिकांना धाडस दिले.

मोहारे कुटुंबीयांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नेशन फर्स्ट या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून रेशन, कपडे, फळ, व्हीलचेअर व दैनंदिन उपयोगातील वस्तू प्रदान करण्यात आली. यावेळेस मंडळ अधिकारी अशोक लांजेवार, तलाठी रवी गुप्ता, नरेश तागडे, बीट जमादार लिल्हारे, सोनवाने, चुटे, महिला पोलीस सौ. धार्मिक, राहुल बोरकर, सरपंच चैतलाल हटीले, ग्रा.स. प्रदीप मोहारे व गावकरी उपस्थित होते.

Related posts