गोंदिया कोरोना अपडेट: २२० रुग्ण बरे, नविन २२९ पॉझिटिव्ह रुग्ण..

660 Views

 

गोंदिया, दि.२८ (जिमाका) जिल्ह्यातील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आज २२० रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केली. नविन २२९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आज २२९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १२३ रुग्ण आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील राजाभोज कॉलनी-१, सिंधी कॉलनी-७, न्यू लक्ष्मीनगर-२, रिंग रोड-३, रेलटोली-२, गंज वार्ड-२, सिव्हील लाईन-३, रेल्वे गेट-१, एकोडी-२, गोंदिया-११, बाजपेयी वार्ड-३, न्यू लक्ष्मीनगर-१, गणेशनगर-८, कटंगी-२, माताटोली-२, नागरा-१, पुनाटोली-२, कुडवा-२, सुभाषनगर-२, गौरीनगर-१, काका चौक-१,अंगुर बगीचा-१, टी.बी.टोली-६, हनुमान नगर-१, अवंती चौक-३, गंज वार्ड-१, खमारी-२, हिवरा-१, श्रीनगर-४, फुलचूर-४, रतनारा-१, गजानन कॉलनी-२, नागरा-१, रावणवाडी-२, काचेवानी-१, कारंजा-१, साई कॉलनी-१, धामणगाव-१, सर्कस ग्राऊंड-१, मामा चौक-३, बजरंग नगर-१, जिल्हा परिषद कॉलनी-१, मुर्री-१, सुर्याटोला-१, यादव चौक-१, गुरुनानक वार्ड-३, अप्पाजीनगर-१, चंद्रशेखर वार्ड-१, मरारटोली-१, डब्लींग कॉलनी-१, छोटा गोंदिया-१, सेलटॅक्स कॉलनी-२, शास्त्री वार्ड-२, रेल्वे कॉलनी-४, सुरजमल वार्ड-१, राजेंद्र वार्ड-१, कृष्णपुरा वार्ड-१, भागवतटोला-१, शंकर चौक-१ व कामठा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बसस्टॉप जवळ-४, तिरोडा-२०, धादरी-१, ऑफिसर कॉलनी-१, भुतनाथ वार्ड-३, सज्जन वार्ड-१, नेहरु वार्ड-२, गांधी वार्ड-१, गजानन कॉलनी-१, पारस वार्ड-१, बिहिरीया-१, महावीर कॉलनी-४, सुभाष वार्ड-१, तिलक वार्ड-२, फुले वार्ड-१ व चिरेखनी येथील एक रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील लेंडेझरी-१, गोरेगाव-३, कवलेवाडा-४, बाजारटोला-१ व तुमखेडा येथील चार रुग्ण. आमगाव तालुक्यातील ठाणा-१ व दहेगाव येथील एक रुग्ण. सालेकसा तालुक्यातील बडेटोला-१, सालेकसा-९, जमखुरा-२, बिजेपार-२, आसीटोला-१, सलंगटोला-३, सातगाव-१ व डोमाटोला येथील एक रुग्ण. देवरी शहरातील वार्ड नं.४ मधील १ रुग्ण. वार्ड नं.१३ मधील एक रुग्ण व वार्ड नं.८ मधील २ रुग्ण. सडक/अर्जुनी तालुक्यातील वडेगाव-१ व सौंदड येथील एक रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-३९३३, तिरोडा तालुका-९१०, गोरेगाव तालुका-२९२, आमगाव तालुका-४१६, सालेकसा तालुका-२९४, देवरी तालुका-२४९, सडक/अर्जुनी तालुका-२१३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२६३ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-८९ रुग्ण आहे. असे एकूण ६६५९ रुग्ण बाधित आढळले आहे.

आज ज्या २२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-११७, तिरोडा तालुका-३०, गोरेगाव तालुका-१५, आमगाव तालुका-१, सालेकसा तालुका-१९, देवरी तालुका-७, सडक/अर्जुनी तालुका-७ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २४ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत ४४७९ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-२७६८, तिरोडा तालुका-५८९, गोरेगाव तालुका-१७७, आमगाव तालुका-२६७, सालेकसा तालुका-१२५, देवरी तालुका-१६३, सडक/अर्जुनी तालुका-१६१, अर्जुनी/मोरगाव तालुका-२१२ आणि इतर-१७ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या २०८७ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-११११, तिरोडा तालुका-३०७, गोरेगाव तालुका-११२, आमगाव तालुका-१४३, सालेकसा तालुका-१६७, देवरी तालुका-८५, सडक/अर्जुनी तालुका- ४९, अर्जुनी/मोरगाव तालुका-४९ आणि इतर-६४ असे एकूण २०८७ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील रुग्णांपैकी ७७८ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-४१२, तिरोडा तालुका-८५, गोरेगाव तालुका-८२, आमगाव तालुका-३०, सालेकसा तालुका-५९, देवरी तालुका-७०, सडक/अर्जुनी तालुका-००, अर्जुनी/मोरगाव तालुका-४० व इतर ०० असे एकूण ७७८ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

आतापर्यंत ९३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-५४, तिरोडा तालुका-१४, गोरेगाव तालुका-३, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.

ज्या पाच कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ७५ वर्षीय रुग्ण राहणार पुनाटोली गोंदिया व ६३ वर्षीय रुग्ण राहणार श्रीनगर गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय रुग्ण राहणार गोंदिया यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४७ वर्षीय रुग्ण राहणार माताटोली गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यांना मधुमेहचा त्रास होता. ६३ वर्षीय रुग्ण राहणार माताटोली गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २९२७८ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २२५६३ नमुने निगेटिव्ह आले. तर ४४३९ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. ९४३ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून १३३२ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात ७ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ३४२ व्यक्ती अशा एकूण ३४९ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २३६३० व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २१३८४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २२४६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १४४ चमू आणि १२७ सुपरवायझर, १२७ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-७, आमगाव तालुका-११, सालेकसा तालुका-९, देवरी तालुका-३५, सडक/अर्जुनी तालुका-८, गोरेगाव तालुका-२४, तिरोडा तालुका-२७ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-६ असे एकूण १२७ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी होऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

Related posts