भंडारा: कोणतेही निकश न लावता 100 टक्के नुकसान भरपाई द्या : आ. फुके यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

207 Views

 

प्रतिनिधि। 21 मई

भंडारा। भाताचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामामध्ये धानाची लागवड केली होती. धान कापण्याच्या स्थितीमध्ये आला असतानाच मागील आठवड्यात आलेल्या जोरदार अतिवृष्टीने धानाचे अतोनात नुकसान झाले. यात लाखनी, लाखांदूर व भंडारा तालुक्यातील बराच धान खराब झाला. याची पाहणी करण्याकरिता आज आ.डॉ. परिणय फुके यांनी भंडारा तालुक्यातील डव्वा व खुर्सिपार भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपबीती सांगून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी आ.फुके यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. त्यानुषंगाने आ. फूके यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन झालेल्या धानाच्या नुकसानी बाबत चर्चा केली.सद्या शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक डबघाईस आलेला आहे. त्यातच हातात आलेले धानाचे पिक अवकाळी पावसामुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी फार आर्थिक अडचणीत सापडला असुन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांना केली.

धानाचे नुकसान कसे झाले यासाठी आ. फुके यांनी आणलेली धानाची पेंढी जिल्हाधिकारी यांना दिली. जिल्हाधिकारी यांनी पंचनामे पुर्ण करुन लवकर मोबदला देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आ. परिणय फुके यांना दिले.

या दौऱ्यामध्ये विनोद बांते तालुकाध्यक्ष भंडारा भाजपा , नीलकंठ कायते जि.प.सदस्य, टेकराम पडोळे सर, तीलकजी वैद्य जिल्हाध्यक्ष भाजयुमो, रंजना मोटघरे, सरपंचा माडगी, तलाठी राजकीमर बांबोळे, गुरुदेव मस्के पो.पा.
प्रवीण सोरतकर ग्रामसेवक, संध्या निंबार्ते, सरपंचा शामकला उईके उपसरपंच , उर्मिला चाचेरे, संतोष मते, शुभम चौधरी, लोकेश गभने उपस्थित होते.

Related posts