भंडारा: अखेर जिल्ह्यात रबी धान खरेदी प्रक्रिया प्रारंभ, सात ठिकाणी खरेदी सुरु…

447 Views

 

प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांना यश : आणखी केंद्र वाढणार…

भंडारा (20मे) : रबी हंगामातील धान खरेदीचा मुहूर्त निघत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले हाेते. अखेर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात आधारभूत किंमत रबी धान खरेदीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. सात ठिकाणी खरेदी सुरु झाली असून आणि केंद्र वाढविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

रबी हंगामातील धान खरेदी माेठा तिढा निर्माण झाला हाेता. खरीप हंगामातील धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने गाेदाम हाऊसफूल हाेते. साधारण १ मे पासून पणनची रबी धान खरेदी सुरु केली जाते. मात्र शेतकऱ्यांच्या घरात धान आल्यावरही खरेदी सुरु हाेण्याचे काेणतेच चिन्ह दिसत नव्हते. ही बाब तुमसरचे आमदार राजू कारेमाेरे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुंबई येथे चर्चा केली. त्यावेळी ना. भुजबळ यांनी येत्या तीन दिवसात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिले हाेते. त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यात सात ठिकाणी पणनच्या धान खरेदीला प्रारंभ झाला. त्यात पिंपळगाव, लाखनी, साकाेली,  बघेडा येथील धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे. काेराेना संकटाच्या काळात धान खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळणार आहे.

ऑनलाईन नाेंदणीला मुदत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा…

रबी हंगामातील शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी ऑनलाईन सातबारा न ाेंदणीची मुतद ३० एप्रिल हाेती. परंतु काेराेना संसर्गामुळे ऑनलाईन नाेंदणी करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. यासंदर्भात खासदार प्रफुल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली. आता ३१ मेपर्यंत ऑनलाईन नांेदणीला मुदतवाढ मिळालाी असून शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

Related posts