सालेकसा: मनसेच्या मागणीला यश, मनरेगा चे अर्धवट असलेले काम होणार पूर्ण..

268 Views

 

प्रतिनिधी। 16 मे

सालेकसा। संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात covid-19 च्या वाढता प्रादुर्भाव मुळे सर्व कामे व आस्थापने बंद करण्याचा निर्णय माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतला. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांना सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ग्रामीण क्षेत्रात मनरेगा शिवाय इतर कोणतेही काम नसल्याने ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांचा उपजीविकेचा प्रश्न उद्भवला होता. याची दखल घेत मनसेचे सालेकसा शहर अध्यक्ष राहुल हटवार यांनी पुढाकार घेत सालेकसा तहसीलदार कांबळे यांना संपर्क साधले. त्यावर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कार्यपालन अधिकारी यांच्या आदेशाशिवाय काम सुरु करता येणार नाही, अशी माहिती दिली.

मागील वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवली असता तत्कालीन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी 25 कामगारांना घेऊन covid-19 च्या सर्व अटींचा पालन करत कामे सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. याचा दाखला देत राहुल हटवार यांनी उपजिल्हाधिकारी मनरेगा गोसावी यांना संपर्क साधला व ग्रामीण क्षेत्रातील जनतेचे समस्या मांडल्या. त्यावर तोडगा काढत एका कामावर फक्त दहा कामगारांना कामावर ठेवत covid-19 च्या सर्व अटींचा पालन करत कामे सुरू ठेवू शकता अशी माहिती दिली. यासंबंधी सालेकसा तहसीलदार कांबळे यांनीसुद्धा उपजिल्हाधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क साधून सदर विषयाची गांभीर्य लक्षात आणून दिले.

त्यावर तत्काल कार्यवाही करत गोसावी यांनी दहा लोकांना घेऊन कामे सुरू ठेवा परंतु covid-19 च्या सर्व अति शर्तींचा पालन झाल्या पाहिजे अशी ताकीद देत कामे सुरू करण्याचे आदेश दिले. मनरेगा अंतर्गत विविध विभागांचे कामे अर्धवट राहिल्याने नागरिकांना रोजगाराचा तसेच कंत्राटदारांना उघड्यावर पडलेल्या साहित्य चोरीला जाण्याची भीती होती. यावर तत्काल मार्ग काढणे गरजेचे असल्याचे बघत मनसेचे शहराध्यक्ष राहुल हटवार यांनी सदर विषयाला मार्गी काढले. यामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.

Related posts