रोगप्रतिकार शक्ती वाढवा,कोरोना वर मात करा- डॉ सुवर्णा हुबेकर

324 Views

 

प्रतिनिधि। 7 एप्रिल

गोंदिया। केटीएस येथे जागतिक आरोग्य दिन च्या निमित्याने 7 एप्रिल रोजी कॉविड प्रतिबंधक जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर होत्या.  Dchc चे नोडल अधिकारी डॉ. जयस्वाल, कॉविड लसीकरण नर्सेस स्टाफ श्री विनय अवस्थी व दुर्गा ठाकरे, फार्मसी अधिकारी रामटेके आदी उपस्तीत होते.

जागतिक आरोग्य दिन निमित्त आरोग्य देवता धनवंतरी चे डॉ हुबेकर यांचे हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व कॉरोना योद्धा साठी आरोग्य धनसंपदा लाभू दे मनहून सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

या वेळी रुग्णांना मार्गदर्शन करताना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्ण हुबेकर यांनी आव्हान केले की या कोरोना पांडेमिक काळात स्वतःची काळजी घ्या रोग प्रतिकार शक्ती वाढवा संतुलित आहार नियमित व्यायाम व पुरेशी झोप घ्या मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका शारीरिक अंतर ठेवा गर्दी टाळा व सतत साबण पाणी ने हात धुवा तरच आपण सुरक्षित राहू. कॉविड लसीकरण स्टाफ श्री विनय अवस्थी यांनी कॉविड महामारी चे काळात लसीकरण किती महत्वपूर्ण आहे हे सांगितले. त्यामुळे पात्र लोकांनी लस उपलब्ध होताच लवकर लसीकरण करून घेणे हाच एक उपाय आहे म्हणाले जागतिक आरोग्य दिन निमित्त सुंदर व आरोग्य दायी जगाची निर्मिती करू या व करोना वर मात करू असा आरोग्यदायी संकल्प केला. कार्यक्रमासाठी लसीकरण केंद्रातील स्टाफ ने सहकार्य केले.

Related posts