भंडारा जिल्ह्यात आज 846 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, 4 मृत्यु, 218 रुग्णांना डिस्चार्ज

548 Views

 

प्रतिनिधि। 3 एप्रिल
भंडारा, दि.3:- जिल्ह्यात आज 218 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15287 झाली असून आज 846 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20017 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.37 टक्के आहे.

आज 5184 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 846 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 94 हजार 318 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 20017 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 354, मोहाडी 124, तुमसर 79, पवनी 88, लाखनी 109, साकोली 70 व लाखांदुर तालुक्यातील 22 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 15287 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 20017 झाली असून 4379 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 04 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 351 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.37 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.75 टक्के एवढा आहे.
शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन
• कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
• साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
• साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

Related posts